मराठी इंडस्ट्रीमधील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. तिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळाले. आज १३ ऑक्टोबर रोजी स्पृहा जोशीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया स्पृहा जोशीविषयी काही खास गोष्टी…