बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या जोडप्याबद्दल सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे. असे म्हटले जात आहे की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी बिनसल्या आहेत. त्यामुळे या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट एका अभिनेत्रीमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता ही अभिनेत्री कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.