राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाब सिद्दीकी यांची काल मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री
.
विजय वडेट्टीवार म्हणाले, बाबा सिद्दकी माझ चांगले मित्र होते. आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तो नेता लोकप्रिय होता आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम होते. काल झालेली घटना अत्यंत दुखद आणि वेदनादायी आहे. त्या घटनेनंतर महाराष्ट्र किंवा मुंबईत कायदा सुव्यवस्था राहिली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. भायकळ्यात झालेली खुनाची घटना ज्या पद्धतीने करण्यात आली, त्यावरुन गुन्हेगारांना वचक, धाक राहिलेला नाही. आम्ही काही केले तरी सरकार आमच्या पाठीशी आहे, असे गुन्हेगारांना वाटत असेल. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. चार दिवसांनंतर आचारसंहिता लागू होईल. आम्ही त्यांचा राजीनामा मागून आमचे तोंड खराब करु इच्छित नाही, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला. ते कुपर रुग्णालयाबाहेर बोलत होते.
राज्यात पोलिसांचे दोन ग्रुप पुण्यात मागील सहा महिन्यांत घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांपैकी एका घटनेत सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनीच ती गँग पोसली होती. त्यांना समर्थन देत होते, त्यांना पाठिशी घालत होते, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. सत्ताधारी अशा पद्धतीने वागत असतील तर सामान्य जनतेने काय करावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकार आणि गृहमंत्र्यांची आहे. महाराष्ट्रात पोलिसांचे दोन ग्रुप पडले असून त्यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे पोलिसांना प्रोत्साहन मिळत नाही. मर्जीच्या ठिकाणी मर्जीतल्या माणसाला बसवण्याच्या हट्टापायी पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचणी येत आहेत. त्यामुळे गुंडांना अभय मिळाल्यासारखे वाटते म्हणून मुंबईत अशाप्रकारच्या घटना होतात, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
…तर फडणवीसांना खुर्ची प्रिय ही झालेली घटना दुखद आहे. याची चौकशी होईल, त्यामागचा सुत्रधारही समोर येईल. पण मुंबई युपी बिहारच्या दिशेने जात आहे. शांत असलेली मुंबई गुंडराजाची होती का काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे गृहमंत्री कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, हे स्वत:ला विचारा, असे मी फडणवीसांना विचारणार आहे. एवढे सगळे होऊनही तुम्हाला त्या पदावर राहायचा अधिकार असेल तर बसा. पुन्हा राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा उडाला तरी तुम्हाला खुर्ची प्रिय आहे, हे जनता बघेल, अशी टीका त्यांनी केली.
तुमची सुरक्षा तुम्ही बघा असे होर्डिंग सरकारने लावावेत
काल दुर्गा-शारदांच्या विसर्जनाचा दिवस होता. रस्त्यावर जमाव असताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या जात असतील तर महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे शासनाने स्वत:च्या जाहीरातीचे बोर्ड लावण्यापेक्षा, आम्ही जनतेची सुरक्षा करु शकत नाहीत. तुमची सुरक्षा तुम्ही बघा असे होर्डिंग लावावेत. म्हणजे लोक आपली सुरक्षा स्वत: करतील, अशी टीका वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.