हरियाणामधील पराभव दुर्दैवी आहे, त्यातून बरेच काही शिकता आले. कोणी कोणाला मोठा भाऊ छोटा भाऊ समजत नाही लोकसभेतला यश हे इंडिया आघाडीचे यश आहे, काँग्रेस पक्षाला अन्य राज्यातील निवडणुकीसाठी भूमिका घ्यावी लागेल. स्वबळावर लढायचे असेल, तर त्यांनी तशी भूमिका
.
हरियाणाचा विजय फार मोठा महान विजय नाही. ठिकठिकाणी अपक्षांनी मत घेतली. जो जिंकतो सिकंदर अशी हिंदीमध्ये म्हण आहे. देवेंद्र फडणवीस हरियाणामध्ये गेले आणि विजय प्राप्त झाला असे काही होत नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी लनगावला आहे.
..तर इंडिया आघाडीला फायदा
संजय राऊत म्हणाले की, हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकली. हरियाणात इंडिया आघाडी झाली असती, सपा, आप, एखादी जागा शिवसेना, एनसीपीला मिळाली असती, तर याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता. काँग्रेसला वाटले आम्ही एकतर्फी जिंकू. आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस कमजोर असते, तिथे ते प्रादेशिक पक्षाची मदत घेतात. हे भाजपाचच धोरण आहे. जिथे काँग्रेसला वाटते आपण मजबूत आहोत, तिथे ते स्थानिक पक्ष, इतरांना महत्त्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरियाणासारख्या निकालात दिसतो.
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे नेतृत्व जागरुक
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिघांची महाविकास आघाडी आहे.शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व जागरुक आहे, हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, असे राऊतांनी म्हटले आहे.