Metro Connect 3 ॲपचे अनावरण, मात्र प्रवासी नाखूश



मुंबई मेट्रोची (mumbai metro) एक्वा लाइन सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांनी तिकीट (ticket) प्रणालीबाबत चिंता व्यक्त केली आहे. शहरातील तीन मेट्रो मार्गांपैकी प्रत्येक मार्गावरील तिकीट काढण्यासाठी वेगवेगळ्या मोबाइल ॲप्सचा वापर करणे अनेक प्रवाशांना गैरसोयीचे वाटत आहे.

1. नवीन मेट्रो 3 या कॉरिडॉरसाठी तिकिटे केवळ मेट्रो कनेक्ट 3 या मोबाइल ॲपद्वारेच खरेदी केली जाऊ शकतात.

2. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) आणि पेटीएम आणि व्हॉट्सॲप सारख्या ॲप्ससह एकत्रित केलेले क्लोज्ड-लूप कार्डचा वापर होतो.

3. मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ची तिकिटे मेट्रो 1 नावाच्या ॲपद्वारे खरेदी केली जाऊ शकतात.

मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या उद्घाटनानंतर शनिवारी, 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते MetroConnect3 ॲप लाँच करण्यात आले. या ॲपमध्ये (app) प्रवासी ड्रॉप-डाउन मेनूमधून तारीख आणि प्रवासाचा प्रकार निवडू शकतात.

तसेच बोर्डिंग आणि डेस्टीनेशन देखील निवडू शकतात. ॲप वापरकर्त्यांना फोन लोकेशन वापरून स्टेशन देखील निवडता येऊ शकते.

इतर वैशिष्ट्यांमध्ये प्रवासी भाडे, ट्रिप-सेव्हिंग पर्याय समाविष्ट आहे. या ॲपमध्ये जवळपासच्या पर्यटन स्थळांचीही यादी आहे. हे ॲप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. हे स्टेशन सुविधा, प्रवेशयोग्यता आणि जवळपासच्या सेवांबद्दल तपशीलवार माहिती देते.

सूत्रांनुसार, अधिकारी मेट्रो कनेक्ट3 ॲप NCMC सोबत जोडण्याचे काम करत आहेत. यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या मेट्रो मार्गांवर एक कार्ड वापरता येईल. मात्र, या एकीकरणासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) लवकरच शहरातील सर्व मेट्रो मार्गांचे व्यवस्थापन करू शकते. आगामी काळात मेट्रो 3 देखील कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24