औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि आता अहमदनगरचे देखील नाव बदलण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे प
.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्यात यावे, अशी मागणी कित्येक दिवसांपासून होत होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा केली होती. केंद्र सरकारने नामांतरासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाली.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे ट्विट
अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती. नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे, असे विखे पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी नामांतराच्या निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले.
नामांतराविरोधात दाखल केली होती याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण करण्याची घोषणा केली होती. यानंतर माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या नामांतराच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.
नामांतर अहिल्यानगरचं का? अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. त्या इंदूरच्या मल्हारराव होळकर यांच्या सून होत्या. मल्हाररावानंतर अहिल्यादेवी यांनी राज्यकारभार सांभाळला होता. अहिल्यादेवी यांनी आपल्या शासनकाळात देशभरात मंदिरे, धर्मशाळा, विहीरी तसेच अनेक अन्नछत्रे सुरू केली होती. त्यामुळे अहिल्यादेवी यांचे नाव जिल्ह्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतला.