Malaika Arora : मलायकाने दाखवला नवा हेअरकट! वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर दिसली अभिनेत्री


बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले होते. अभिनेत्रीचे सावत्र वडील अनिल मेहता यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानंतर अभिनेत्री सोशल मीडियापासून दूर गेली होती. मात्र, आता तिने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा मलायकाची झलक पाहायला मिळाली आहे. पण, मलायकाने ही पोस्ट स्वत: शेअर केलेली नाही,तर तिच्या हेअरस्टायलिस्टने शेअर केली आहे. त्याने ही पोस्ट मलायकाला टॅग केली आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाला नवीन हेअरस्टाईलसह एका नव्या लूकमध्ये पाहिल्यानंतर,चाहते देखील खूप आनंदी झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24