उद्योजकांनी सरकारी अनुदानाच्या भरवशावर राहू नये. अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेला देखील पैसे द्यावे लागतात, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. या विधानावरुन विरोधक महायुती सरकार निशाणा साधत आहेत. सगळे पै
.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान मिळणार नाही. कारण सरकारचे सगळे पैसे लाडक्या बहिणीसाठी वापरले आहेत. कोणत्याही बहिणीला अनुदान मिळणार नाही. पुढील दोन महिन्यांत सर्व योजना बंद होतील. केवळ तीन योजना चालू राहणार आहेत. आतापर्यंत निवडणुकीत टेबलाच्या खालून पैसे देत होते. आता वरून पाच हजार रुपये देत आहेत. त्यांचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले की अनुदान बंद होणार आहे. सरकार दिवाळखोर झाले आहे. कारण सगळे पैसे खर्च झालेत. लाडक्या बहिणींना विकत घेणार का? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी सरकारकडे केला आहे.
विमानतळ नाही तर विमानसेवा हवी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरातील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावरूनही प्रणिती शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आम्हाला सोलापूर विमानतळ नकोय, सोलापुरात मागील पन्नस वर्षांपासून विमानतळ आहे. आम्हाला विमानसेवा पाहिजे, असे शिंदे म्हणाल्या. मी विमानतळावर बोलायला सुरुवात केली की, तुमचे अक्कलकोटचे आमदार बोलायला येतील, असा टोला प्रणिती शिंदे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लगावला.
सरकारला तोंड दाखवायची लायकी राहिली नाही प्रणिती शिंदे यांनी यावेळी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर आणि मालवण येथील पुतळा घटनेवर देखील भाष्य केले. बदलापूर घटनेतील भाजपचे दोन पदाधिकारी अद्याप फरार आहेत. मात्र एका व्यक्तीचा एन्काउंटर केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारला तोंड दाखवायची लायकी राहिली नाही, असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे.