छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट.’ सध्या मालिकेत लकीचे प्रकरण समोर आले आहे. मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीच्या पोटात लकीचे बाळ असते. पण लकी त्या बाळाला नाव देण्यास नकार देतो. आता मुक्ता आरतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. सागर आणि कोळी कुटुंबीय मुक्ताला विरोध करत असतात. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया…