माझा फोन इनकमिंगसाठी सदैव चालू: एखाद्याला ब्लॉक करण्याला लोकशाही म्हणत नाहीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान – Pune News



आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इनकमिंग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला फोन इनकमिंगसाठी सदैव सुरू असल्याचे सूचक विधान केले आहे. माझा फोन इनकमिंगसाठी सदैव चालू असतो. एखाद्याला ब

.

सुप्रिया सुळे मंगळवारी पुण्यात बोलताना म्हणाल्या, भाजप जुना पक्ष आहे. पण आजही त्यांच्यात टॅलेंट दिसत नाही. चांदीच्या ताटात जेवण्याची वेळ येते तेव्हा भाजपचे मूळ कार्यकर्ते बाजूला राहतात आणि दुसरेच कुणीतरी ताटावर बसल्याचे दिसतात. त्यामुळे काहीही केले तरी भाजपला राज्यात यश मिळताना दिसत नाही. वर्षभरापूर्वी आमची स्थिती काय होती? आणि आज कुठे आहोत? एक वर्षापूर्वी पक्ष कुठे होता व चिन्ह कुठे होते?

तेव्हा आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते

ते लोक आमदार, खासदार, सत्तेची पदे एवढेच नाही तर पक्ष व चिन्हही घेऊन गेले. आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझ्यावर माझ्या मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा करण्याची वेळ आली. पण सत्य परेशान हो सकता आहे, मगर पराजित नही. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला साथ दिली. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला हे त्यांना दिसले. दिल्लीच्या अदृश्य शक्तीला दिल्लीतून काहीही करता येते हे वाटत होते. पण मायबाप जनतेनेने दिल्लीतून असे काहीही करता येत नाही हे अदृश्य शक्तीला दाखवून दिले. हा देश केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालतो आणि चालेल.

आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही. आम्ही संविधानवाले आहोत. आम्ही संविधान केंद्रस्थानी ठेवून राजकारण करतो. सशक्त लोकशाहीत विरोधक दिलदार असला पाहिजे. शरद पवारांना रोखा, उद्धव ठाकरे यांना रोखा आणि वेळ पडली तर त्यांचे पक्ष व कार्यकर्ते फोडून सत्तेत या अशी या नेत्यांची विचासरणी असल्याचेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.

पक्ष सोडणाऱ्यांसाठी अजून कवाडे खुले

सुप्रिया सुळे यांनी यावेळी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांसाठी आपल्या पक्षाची कवाडे अजून खूले असल्याचेही संकेत दिले. त्या म्हणाल्या, माझा फोन इनकमिंगसाठी सदैव चालू असतो. एखाद्याला ब्लॉक करण्यास किंवा फोन बंद करण्यास लोकशाही म्हणत नाहीत. ही वैयक्तिक नव्हे तर वैचारिक लढाई आहे. माझी चर्चा सर्वांशी होते. पण ते बोलत नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी केव्हाही कुणासोबतचे संबंध तोडले नाहीत.

गायीला राज्यमाता दर्जा देण्याच्या निर्णयात काहीही नवे नाही

राज्य मंत्रिमंडळाने गायीला राज्यमातेचा दिलेल्या दर्जावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपण गायीला नेहमीच गोमाता म्हणतो. गाईला माता म्हणण्याची आपली संस्कृती आहे. आपण अन्नपूर्णेचीही पुजा करतो. त्यामुळे मला या निर्णयात काहीही नवीन वाटत नाही. आपण सर्वजण शेतकरी आहोत, आपण बैलपोळाही साजरा करतो.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यावेळी लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचे एन्काउंटर न करता फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून सर्वांपुढे फाशी देण्याचीही मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24