लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद पाहण्यास मिळाला, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला असून जोरदार पलटवार देखील केला आहे. तुम्हाला भ्रष्ट लोकांची म
.
खासदार संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या तोंडात सध्या जिहाद खूप येत आहे. वोट जिहाद काय असतो त्यांना एकदा विचारा. ते दुसरीकडे कुठे तलाक देत आहेत का? कोणाशी निगाह करत आहेत का? मतांसाठी इतर कोणत्या पक्षाशी ते निकाह करत आहेत का? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. आधी जिहादचा अर्थ समजून घ्या, मग त्यावर बोला, असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणीवीसांना भ्रष्ट लोकांची मते चालतात, त्यावर तुम्ही भ्रष्टायाऱ्यांशी निकाह लावला असे म्हणू का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. 70 हजार कोटींचे घोटाळे, चाळीश आमदारांचे घोटाळे तसेच एकनाथ शिंदेंचे घोटाळे, या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही सोबत घेतले आहे. मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावला असे मी सांगू का? अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?
कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद बघायला मिळाले. धुळ्यातील सहा पैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगावमध्ये मतदारसंघात 1 लाख 94 हजार मतांनी मागे जातो आणि 4 हजार मतांनी हरतो. निवडणुकीत हार जीत महत्त्वाची नाही, कधी हा पक्ष जिंकेल, तर कधी तो पक्ष जिंकेल. मात्र संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून 48 पैकी 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांना केला होता.
हिंदू समाजातील मुलींना फसवून नासवले जात आहे. एक लाखांपेक्षा जास्त घटना खोटं बोलून लग्न करून फसवणूक केल्याच्या आहेत, हा लव्ह जिहाद आहे. व्होट जिहाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता, समाजाला दिशा देणाऱ्यांनी आता समाजाला अजून जागे करायला हवे. आज देशात सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे सरकार आहे. गोमाता आणि आपली संस्कृती पुढे नेणारे सरकारच आता आपल्याला हवे आहे. आपण जसे संघटित होत आहोत तसेच आपले विरोधी लोक संघटित होत आहेत. आपली लढाई सत्याची आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकावीच लागणार आहे, असेही फडणवीस म्हणाले होते.