अभिनेत्री पलक सिधवानीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर अनेक आरोप केले आहेत. पलकने सांगितले की, शोच्या निर्मात्याने तिला धमकावले आणि आजारपणातही तिला सतत काम करायला लावले. मीडियाशी बोलताना पलकने सांगितले की, शोच्या निर्मात्यांनी तिला धमकावले. तिने ज्या ब्रँडसोबत काम केले आणि पैसे मिळवले, त्याचा तपशील देण्यासाठी देखील तिच्यावर दबाव निर्माण करण्यात आला होता.