बारामतीच्या TC कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा निर्घृण खून: अल्पवयीन तरुणांनी केलेल्या हल्ल्यात जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव – Pune News



पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सुप्रसिद्ध तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून, उपविभागीय अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्य

.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील टी सी कॉलेजमध्ये सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते. त्यावेळी 2 तरुणांमध्ये अचानक वाद आझाला. त्यानंनतर एका तरुणाने त्याच्याच वर्गातील दुसऱ्या तरुणावर चाकूने हल्ला चढवला. त्यात सदर तरुण गंभीर जखमी झाला. वार वर्मी लागल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे महाविद्यालयात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पुढील सोपस्कारासाठी रुग्णालयात पाठवला. घटनेनंतर आरोपींनी महाविद्यालयातून पोबारा केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुण अल्पवयीन होता. या घटनेत 2 अल्पवयीन मुलांचा हात आहे. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. सदर खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस सर्वच अंगाने तपास करत आहेत. हे प्रकरण प्रेम प्रकरणातून घडले काय? याचाही तपास केला जात आहे.

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरला जात असलेल्या प्रवासी तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी त्याच्याकडील बॅग चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका भागात घडली. याबाबत आकाश बाबासाहेब आगळे (वय २०, रा. विठ्ठलनगर, खराडी) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा पुण्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तो रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरला निघाला होता. दुचाकीवरुन आलेल्या 4 अनोळखी चोरट्यांनी त्याच्याकडे तंबाखू मागितली. त्यावेळी त्याने तंबाखूचे सेवन करत नसल्याचे चोरट्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी थेट त्याला मारहाण सुरू केली. त्याच्या डोक्यात जोरात हातोडी मारून त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याच्याकडील बॅग आणि मोबाईल हिसकावून ते पसार झाले. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24