धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास ट्रस्टने सुरुवात केली आहे. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला होता. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात ध
.
विशेष म्हणजे मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मशीद 60 वर्षांहून अधिक जुनी आहे. या मशिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नाही. जेव्हा ही मशीद बांधली गेली तेव्हा तिला ग्राउंड प्लस 2 मजले होते. पावसाचे पाणी या मशिदीत शिरायचे आणि त्यामुळे मशिदीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.
वाढत्या लोकसंख्येमुळे मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एक मजला वाढवण्यात आला. तीन वर्षांपूर्वीपासून हे काम सुरू होते आणि आताच मशीद पूर्णपणे तयार झाली आहे. धारावी मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीची टीम आल्यावर गोंधळ झाला होता. त्यावेळी हजारोंचा जनसमुदाय जमला होता.
धारावी मशिदीबद्दल काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य समोर आले होते. हा न्यायालयाचा निर्णय आहे, असे ते म्हणाले होते. यापूर्वीही न्यायालयाने बेकायदा बांधकाम हटवण्यास सांगितले होते. त्यावेळीही बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी बीएमसी पोहोचली होती, त्यानंतर ईदनंतर बेकायदा बांधकाम हटवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर बीएमसीचे पथक तेथे गेले. बीएमसी आल्यावर मस्जिद कमिटीने सांगितले की त्यांना 4 ते 5 दिवसांचा अवधी हवा आहे, त्या दरम्यान ते स्वतः बेकायदा बांधकाम हटवतील, त्यामुळे बीएमसीची टीम परतली. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मला विश्वास आहे की मस्जिद समितीने बीएमसीला ज्या प्रकारे आश्वासन दिले आहे, त्याच पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.