मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल द्वेष करत आहेत. यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी भाष्य केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनामागे काही सत्तेबाहेरील सूत्रधार
.
नरेंद्र पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला एसईबीसीमधून 12 टक्के आरक्षण मिळाले. मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तसेच सारथी सारखी संस्था काढली. या दोन्हीमधून मराठा समाजातील युवकांना फायदा झाला आहे. फडणवीसांनी एवढे चांगले काम करून देखील मनोज जरांगे त्यांच्याबद्दल द्वेष व्यक्त करत असतील, तर त्यामागे कोणी बोलावता धनी असला पाहिजे.
जरांगेंच्या आंदोलनामागे सत्तेबाहेरील सूत्रधार नरेंद्र पाटील म्हणाले की, जे सत्तेत नाहीत ते मनोज जरांगेच्या आंदोलनामागचे सूत्रधार असू शकतो. मग ते कुणीही असू शकतात. काही अतृप्त आत्मा असतील ज्यांना मराठा समाजाचे प्रश्न झुलवत ठेवायचे असतील. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी भापज-शिवसेना सत्तेवर होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विराधी पक्षात होते. मात्र, सध्या एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत तर विरोधी पक्षात ठाकरेंचा गट आहे तो असू शकतो. अजित पवार सत्तेत आहेत तर शरद पवारांचा गट त्यामागे असू शकतो, असा संशय देखील नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
…तर फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर होईल
नरेंद्र पाटील म्हणाले की, मनोज जरांगे हे आंदोलनाच्या आधी महामंडळाबाबतच्या कामासाठी मला भेटायचे. त्यांची कामेही आम्ही करत होतो. ते नेहमी सामान्य कार्यकर्ता म्हणून न्याय मिळवण्यासाठी काम करत होते. आता त्यांच्या आंदोलनाचे चळवळीत रुपांतर झाले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे वेगळेपण दाखवले. आता आगामी विधासभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार उभे करणार असे ते म्हणत आहेत. मात्र कुणाच्या विरोधात उभे करणार याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. या सगळ्यामागे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले जात आहे. यामागे असणारे सूत्रधार मनोज जरांगेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या मनातील फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर होईल, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
हेही वाचा…
मनोज जरांगे यांचाही दसरा मेळावा!:नारायण गडावर आयोजनासाठी चाचपणी; राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हेदेखील आता दसरा मेळावा घेणार आहेत. त्यासाठी नारायणगडावर जागेची चाचपणी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका ते या मेळाव्याच्या माध्यमातूनच स्पष्ट करतील, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सविस्तर बातमी वाचा…