धनगर समाजाला अनुसूचित जमाती वर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नेवासे फाट्यावर १० दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यातील दोन आंदोलक गुरुवारी गोदावरीत जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळी प्रवरा संगमावरील पुलापासून
.
बाळासाहेब कोळसे व प्रल्हाद सोरमारे यांच्यासह ६ जणांनी उपोषण सुरू केले होते. सरकारी यंत्रणा त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरोप करत गुरुवारी या दोघांनी जलसमाधी घेण्याची चिठ्ठी लिहून ते आंदोलन स्थळावरून बेपत्ता झाले होते. त्यांच्या शोधासाठी प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रांताधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार संजय बिरादार, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रात्र तणावात जागून काढली. दरम्यान, सरकारच्या निषेधार्थ गुरुवारी दिवसभर नगर -संभाजीनगर मार्गावर गोदावरी-प्रवरा संगम पुलावर दुपारी दोन ते पाच व सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत धनगर समाजाच्या वतीने चार टप्प्यात रास्ता रोको आंदोलन झाले. यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. नेवासे फाट्यावरील उपोषण मात्र सुरूच आहे. शुक्रवारी हे आंदोलक पोलिसांना सापडले. त्यांना सुखरुप ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी अरविंद राठोड यांनी त्यांची तपासणी केली.
नदीत उड्या मारल्या, पण पोहता येत असल्याने बचावले सरकार दखल घेत नव्हते म्हणून आम्ही नदीत उड्या मारल्या, पण पोहता येत असल्याने पुलापासून एक किमी अंतरावर पोहत गेलो. त्यानंतर फुगवट्यालगतच्या कपाशीच्या शेतात पहाटेपर्यंत बसून राहिलो. सकाळी मच्छीमारांना सांगितल्यावर अॅम्ब्युलन्स आली. रस्ता नसल्याने महामार्गावर बैलगाडीतून गेलो, असे कोळसे व सोरमारे यांनी म्हणाले. अहमदनगर-संभाजीनगर सीमेवरील प्रवरा संगमावर दीड किमी अंतरावरील नदीपात्रालगत झोपलेल्या अवस्थेत दोघे आंदोलक प्रशासनाला आढळले.