पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर राेजी पुणे मेट्राेच्या शिवाजीनगर ते स्वारगेट भूमिगत प्रकल्पाचे उदघाटन व स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्राे मार्गिकीचे भूमिपूजन आणि साेलापूर विमानतळाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे हाेणार आहे. पुण्यात
.
मुरलीधर माेहाेळ म्हणाले, आतापर्यंत पुण्यात ३२ किलाेमीटर मेट्राे मार्ग लाेकांच्या सेवेत दाखल झाला असून आगामी काळात मेट्राेचा वनाझ ते चांदणी चाैक व रामवाडी ते वाघाेली असा विस्तार करण्यात येणार आहे. विराेधकांना कुठे आंदाेलन, राजकारण करावे आणि कुठे नाही याबाबत समजले पाहिजे. मेट्रो पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मागील ४० ते ५० वर्षे गल्ली ते दिल्ली एकहाती सत्ता असणाऱ्यांनी कधी मेट्राे सेवा सुरु केली नाही. ज्या विराेधकांनी पुणेकरांसाठी एक इंचाचीही मेट्राे सेवा सुरु केली नाही, त्यांना अशा गाेष्टीचे राजकारण करण्याचा नैतिक अधिकार नाही.
मोहोळ पुढे म्हणाले, आघाडीच्या काळात हजाराे लाेकांचा बळी घेऊन अपयशी ठरलेली बीआरटी याेजना राबवली गेली. अपघाताचे बळी ठरलेले उड्डाणपूल पाडावे लागले. काँग्रेसने भविष्याचा काेणताही विचार न करता पुण्याचे 40 वर्षे नुकसान केले. त्यामुळे त्यांना मेट्रोचे उद्घाटन करण्याचा काेणताही नैतिक अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी माेठ्या प्रमाणात मागील 10 वर्षात पुण्यात विकासकामे केली आहेत. गणपतीत एकाच दिवशी 4 लाख प्रवाशांनी मेट्राे प्रवास केला. ज्यांचे हस्ते भूमिपूजन झाले त्यांच्या हस्तेच मेट्राे उदघाटन हाेते आहे. हा बदल विराेधकांनी समजून घ्यावा. जगात कुठेही मेट्राे मार्ग टप्प्या टप्प्याने हाेत असते.
पुण्यात मोठा प्रकल्प आल्याने आगामी निवडणुकीत ताेंड दाखवयाला जागा रहाणार नाही म्हणून विरोधकांना मळमळ हाेत आहे. लाेकसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला साथ दिली आहे. पुराच्या काळात आघाडीतील नेत्यांच्या तळपायाला देखील पूराचे पाणी लागले नाही आणि आज ते शहराच्या विकासकामा बाबत जिवाच्या आकांताने बाेलत आहेत. अशा राजकारणाला पुणेकर ओळखतात. त्यामुळे ते अशा गोष्टींना थारा देणार नाहीत. काँग्रेस काळात केवळ विविध विकासकामे भूमिपूजन हाेत होते. परंतु त्याची पूर्तता हाेत नव्हती, असेही मुरलीधर मोहोळ यावेळी बोलताना म्हणाले.