मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली: पोलिसांचा भाजपची कार्यकर्ती असल्याचा दावा; मनोरुग्ण असल्याचा संशय – Mumbai News



उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला सत्ताधारी भाजपचीच कार्यकर्ती आहे. तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही महिला मनोरुग्ण

.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. ती आज उजेडात आली. आरोपी महिलेने मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर असलेल्या फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील त्यांच्या नावाची पाटी काढून फेकून दिली. या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता ही महिला सत्ताधारी भाजपचीच कार्यकर्ती असल्याची माहिती उजेडात आली आहे.

महिला भाजपचीच स्थानिक कार्यकर्ती

पोलिस विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मंत्रालयात तोडफोड करणारी महिला भाजपची कार्यकर्ती आहे. तिची ओळख पटली असून, तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सध्या महिला पोलिसांसह पोलिसांचा फौजफाटा तिच्या घराबाहेर उभा आहे. पोलिस महिलेच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महिला त्यांना कोणताही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता तिच्या नातेवाईकांना बोलावले आहे.

सदर महिला दादर येथील एका सोसायटीत राहते. तिने यापूर्वी भाजप कार्यालयात जाऊनही तेथील कार्यकर्त्यांना धमकावले होते. त्याची रितसर तक्रार करण्यात आली होती. तिच्या जवळ नेहमीच चाकू राहतो. तिने सातत्याने मंत्रालयात ये-जा करत असे, असेही या प्रकरणी सांगितले जात आहे.

महिलेवर सोसायटीतही अनेक गुन्हे दाखल

दुसरीकडे, स्थानिकांनी संबंधित महिलेचे मानसिक संतुलन बरोबर नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, संबंधित महिलेचे मानसिक आरोग्य बरोबर नाही. तिच्या विरोधात सोसायटीमध्येही अनेक तक्रारी दाखल आहेत. तिच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. तिला मोकळे सोडले तर ती समाजासाठी घातक आहे. ती सोसायटीत एकटीच राहते. तिला कंटाळून तिचे कुटुंबीयही तिला सोडून गेलेत. तिने तिच्या वृद्ध वडिलांनाही त्रास दिला होता. त्यामुळे त्यांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तिला समुपदेशन किंवा मानसिक उपचारांची गरज आहे.

सदर महिला उच्चशिक्षित आहे. पण आता काही गोष्टींना कारण नसते. आजवर तिने येथे अनेकदा धुडगूस घातला. आता तिने थेट मंत्रालयात जाऊन तोडफोड केली आहे. तिच्यावर योग्य ती कारवाई करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हे ही वाचा…

मंत्रालयात धुडगूस घालणाऱ्या महिलेची व्यथा समजून घेणार:देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; कुणीतरी मुद्दाम पाठवल्याचाही संशय व्यक्त

अहमदनगर – मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर एका महिलेने केलेल्या तोडफोडीमुळे एकच खळबळ माजली आहे. विरोधकांनी या प्रकरणाचा संबंध थेट राज्यातील कायदा सुव्यवस्थेशी जोडत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सदर महिलेने हे कृत्य एखाद्या उद्विग्नतेतून केले का? तिची ही व्यथा आहे का? हे समजून घेऊन पुढील कारवाई करण्याचे संकेत दिलेत. वाचा सविस्तर

मोठी बातमी:मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड, अज्ञात महिलेने पाटी देखील काढून फेकली

मुंबई – उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. काल संध्याकाळी उशिरा ही घटना घडली. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या बाहेर असलेली पाटी देखील फोडून फेकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची आता पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24