वसमत तालुक्यातील मुग, उडीद पिककापणी प्रयोगाची माहितीे देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. 27) आंदोलन सुरु केले आहे. या कार्यकर्त्यांनी सुरवातीला कार्यालयाला टाळे ठोकले आणि त्यानंतर टाळे उघडून कार्यालयात
.
वसमत तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाकडून मदत मिळणे अपेक्षीत आहे. मात्र कृषी कार्यालयाकडून मुग व उडीदाच्या पिकाचे पिककापणी प्रयोग कागदोपत्रीच केल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणे कठीण असून विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा देखील मिळणार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, तालुक्यात मुग व उडीदाचे पिककापणी प्रयोग कोणत्या क्षेत्रावर करण्यात आले. पिककापणी प्रयोगाचे छायाचित्र व इतर माहिती तातडीने द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीष पाटील महागावकर यांनी कृषी विभाग, महसुल विभाग व पंचायच विभागाकडे केली होती. मात्र ता. १३ सप्टेंबर रोजी मागणी केल्यानंतर अद्यापही त्यांना माहिती देण्यात आली नाही.

या प्रकारामुळे आज संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीष पाटील महागावकर, ज्ञानेश्वर माखणे, अलोक इंगोले, हर्षवर्धन कदम, मारोतराव कऱ्हाळे, श्रीनिवास व्यवहारे, चांदू महागावकर, अंकूश नरवाडे, सोपान चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सकाळी दहा वाजता तालुका कृषी कार्यालयास कुलुप ठोकले. त्यानंतर या प्रकाराची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यालयाचे कुलुप उघडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठाण मांडले आहे. मागील सहा तासापासून पदाधिकारी कार्यालयास ठाण मांडून असतांनाही एकही अधिकारी कार्यालयात आला नसल्याने पदाधिकारी संतप्त झाले आहेत. या प्रकरणात आणखी तिव्र आ्ंदोलन करण्याचा इशारा महागावकर यांनी दिला आहे.