अवैधरित्या गावठी पिस्टल, कट्टे बाळगून त्याचा वापर करुन गुन्हे करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. पुणे जिल्हयात मागील 15 दिवसात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. यावरुन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलीस ठाण्यांना अव
.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे पथकाने जुने रेकॉर्डवरील पिस्टल बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती काढत राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिडघर फाटा येथे आरोपी संकेत गोरख चोरघे (वय-21, रा.आंबेगाव पठार, पुणे) यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या ताब्यातून 36 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व तीन काडतुसे मिळून आली.
तर, खेड पोलीस स्टेशनचे हद्दीत होलेवाडी बायपास येथे प्रथमेश रमेश बोऱ्हाडे (वय-25, रा.पाबळ, ता.खेड, पुणे) व सुनील बबन पाचपुते (वय 26, रा.चिंचोशी, ता.खेड,पुणे) यांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. तसेच जुन्नर पोलीस स्टेशनचे हद्दीत कुरण गावचे हद्दीतील बसस्टॉपजवळ रोहित सहादू बटणपुरे (वय-24, रा.बहुळ, ता.खेड, पुणे) यास ताब्यात घेऊन एक गावठी पिस्टल व एक काडतुस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलिसांनी कारवाई करुन तीन जणांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल जप्त केले आहे. याप्रकरणी ओंकार कृष्णराज आदक (वय-19), चेतन शिंदे (वय 21, दोघे रा.निमगाव, पुणे) व शरद देविदास माने (वय 21, रा. पिंपळगाव, अहमदनगर) या आरोपींवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…
अल्पवयीन मुलीवर पुण्यात ओळखीच्या मुलांकडून सामूहिक बलात्कार:कोरेगाव परिसरातील घटना, 4 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील एका १६ वर्षीय मुलीवर ओळखीच्या मुलांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित तरुण मुलीने दोन सज्ञान आणि दोन अल्पवयीन आरोपीं विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सविस्तर बातमी वाचा…