E Commerce साईटवर महागडे मोबाईलही इतके स्वस्त कसे? यामागचं गणित माहितीये?


E Commerce Mobile Discount : सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेकांचच लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे ऑनलाईन लागणाऱ्या सेलवर. ई कॉमर्स साईटवर दरवर्षी या न त्या कारणानं बंपर सेल सुरुच असतात. मग तो मोबाईल असो किंवा एखादी लहानशी वस्तू. 

ई कॉमर्स साईटवर असणाऱ्या या सेलसंदर्भात टेलिव्हिजनपासून मेट्रो स्थानकं आणि इतर अनेक ठिकाणांवरही जाहिराती लावल्या जातात. पण, या साऱ्यामध्ये लाखांचे दर असणाऱ्या या मोबाईलचे दर नेमके इतके कमी कसे होतात हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. इथंही गणित आणि असंख्य इतरही गोष्टींचा समावेश असतो माहितीये? 

प्राईज अँकरिंग ट्रॅप 

प्राईज अँकरिंग ट्रॅप एक स्टॅटर्जी असून, या प्रलोभनामध्ये ग्राहक फसतात. या स्ट्रॅटर्जीमध्ये ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्वप्रथम प्रोडक्टची किंमत कमी करत ग्राहकांचं लक्ष वेधलं जातं. या दरात अमुक एक वस्तू फक्त काही ग्राहकांनाच विकली जाते. यानंतर काही वेळातच प्रोडक्टचा दर काही फरकात वाढवला जातो. ज्या ग्राहकांनी या प्रोडक्टचे कमी झालेले दर पाहिले आहेत ते पुन्हा एकदा हे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी त्या वेबसाईटवर जातात. 

उदाहरणासह समजून घ्या, एखाद्या वेबसाईटवर फोन 60 हजार रुपयांना विकला जात असेल आणि जर तुमचं बजेट 35 हजार रुपये किंवा त्याहून कमी असेल तर हा फोन तुम्हाला खरेदी करता येणार नाही. हाच फोन सेलमध्ये आल्यास त्याची कमाल जाहिरात केली जाते. तो 40 हजारात विकला जाणार असल्याचा दावाही केला जातो. या परिस्थितीमध्ये ज्यांचं बजेट 35 हजार आहे ती मंडळी उरलेल्या 5 हजारांचा विचार न करता तो 40 हजारांचा फोन खरेदी करतात. 

इथंच खरी सूत्र हलतात आणि प्राईज अँकरिंग ट्रॅप सुरु होते. जिथं फोन 40 हजार रुपयांना उपलब्ध असतो खरा पण, त्यासाठी काही क्रेडिट किंवा डेबिट कार्डची अट असते अन्यथा फोनसाठी तुम्हाला साधारण 48 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागते. ग्राहक जेव्हा या किमतीतही फोन खरेदीचा निर्णय घेतात तेव्हा ऑर्डर प्लेस करतानाच वेबसाईट क्रॅश होते आणि प्रोडक्ट आऊट ऑफ स्टॉक होतं. 

पुन्हा जेव्हा फोन खरेदीसाठी संपूर्ण प्रक्रिया ओलांडून ऑर्डर प्लेस केली जाते तेव्हा हे दर 52 हजारांवर पोहोचलेले असतात. अनेकांचा असा समज होतो की, या फोनची किंमत फक्त 4 हजारांनीच वाढली. या संपूर्ण प्रवृत्तीला एफओएमओ(फोमो) म्हणजेच फियर ऑफ मिसिंग आउट असंही म्हणतात. जिथं, 40 हजारांचा फोन आता थेट 52 हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असतो. 

राहिला मुद्दा 60 हजारांचा फोन ई कॉमर्स साईटना 50 हजारांना कसा परवडतो याबाबतचा तर, दरवर्षी या कंपन्या स्मार्टफोनचं अपडेटेड वर्जन लाँच करतात. नवं मॉडेल लाँच होतं तेव्हा अनेक युजर जुनं मॉडेल खरेदी करणं टाळतात. ज्यामुळं हे जुने मॉडेल कमी दरात ई कॉमर्स साईटवर विक्रीसाठी कमी दरात उपलब्ध करून दिले जातात. प्रत्यक्षात जास्तीत जास्त ग्राहकांचं लक्ष वेधणं हा या जाहिराती आणि सवलतींमागचा मुख्य हेतू असतो. विक्रेते आणि ग्राहक दोघांनाही यातून फायदा मिळत असल्यामुळं हे सेल बरेच चर्चेत असतात. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24