महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांच्या चर्चा सुरू आहेत. अनेक पक्ष आपल्याला जागा जास्त मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. अशात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीकडे 15 जागांची मा
.
मिळालेली माहिती अशी की, नागपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. भाकप आणि इतर डावे पक्षांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात भाकपने महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा देखील केली आहे. मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीने आमची मान्य करावी, असे मत भाकपच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने आपला प्रस्ताव मान्य न केल्यास स्वंतत्रपण निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी, अशा सुचना देखील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिल्या आहेत.
भाकपने या जागा मागितल्या
भाकपने महाविकास आघाडीकडे मुंबईतील सायन कोळीवाडा, ठाण्यातील भिवंडी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, यवतमाळ जिल्ह्याती वणी आणि दारव्हा, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, धुळे जिल्ह्याती शिरपूर, अहमदपगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी, यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील पश्चिम शहर आणि नाशिकमधील नाशिक पूर्व या 15 जागा देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा…
अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नाही:तर शिंदेंना मिळालेली मते भाजपची असल्याची संजय राऊत यांची टीका
अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने राज्याच्या तक्तावर तकलादू माणसे बसवले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगजेबाप्रमाणे शहा देखील महाराष्ट्रावर आक्रमण करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्र सगळ्यांचा माज उतरव होतो, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. सविस्तर बातमी वाचा…
महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो!:उद्धव ठाकरे गटाची जहरी टीका; शहांच्या वक्तव्यांवरुन साधला निशाणा
महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अशी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. सविस्तर बातमी वाचा…