अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नाही: तर शिंदेंना मिळालेली मते भाजपची असल्याची संजय राऊत यांची टीका – Mumbai News


अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाची खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने राज्याच्या तक्तावर तकलादू माणसे बसवले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगजेबाप्रमाणे शहा देखील महाराष्ट्रावर आक्रमण करत असल

.

अमित शहा यांना जंजीर चित्रपट बघायला सांगा, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला. केंद्रीय यंत्रणा हातच असल्यामुळेच अमित शहा हे भाई असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र महाराष्ट्राला अशा भाई लोकांची गरज नसल्याची टीका त्यांनी केली. या माध्यमातून राऊत यांनी अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चांगलाच समाचार घेतला.

फडणवीसांनी औरंगाजेबावर चित्रपट काढावा

आनंदी दिघे काय आहे ते आम्हाला जास्त माहिती आहे, ते फडणवीसांना माहिती नाही. आनंद दिघे हे काय होते हे देखील आम्हाला माहिती आहे. ते आमच्या ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. तसेच निष्ठावंत शिवसैनिक होते. एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील जनता मनायला तयार नाही. त्यामुळे आनंद दिघे यांच्यावर चित्रपट काढून त्यांना बाळासाहेबांच्या वर पोहोचवण्याची प्रयत्न चालू असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. फडणीस यांना काढायचाच असेल तर त्यांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला.

तर अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला नसता

एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःचे एक टक्के देखील मतदान नाही. त्यांना जे मतदान झाले ते सर्व भारतीय जनता पक्षाचे मतदान असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांच्याकडे मतदान असते तर त्यांच्या पत्नीचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला नसता. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे मतदार असते तर त्यांचा पराभव झाला नसता. त्यांना जे मतदान झाले आहे ते भाजपचे मतदार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंना भाजपचे मतदान

एकनाथ शिंदे जो स्ट्राइकरेट सांगत आहे तो त्यांचा स्ट्राइक रेट नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान विकत घेतले. पैशाने मतदान विकत घेण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीय जनता पक्षाचे त्यांना झालेले हे मतदान असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे. त्यांना काही मतदान मिळालेले नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या संबंधीत खालील वृत्त देखील वाचा…

महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो!:उद्धव ठाकरे गटाची जहरी टीका; शहांच्या वक्तव्यांवरुन साधला निशाणा

महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अशी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24