कर्णपुरा देवीची यात्रा सुरू होणार आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक वर्षी १५ फुटांचा रस्ता असयाचा. भाविकांनी दर्शनाला ये-जा करण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत होती. त्यामुळे भाविकांसाठी ५० फूटांचा रस्ता मोकळा सोडून रहाट पाळणे, दुकाना उभारा. भाविकांना नाश्त्याची चांगली कॉलिटी देण्याचे सांगा. पिण्यासाठी पाणी ठेवा. अन्यथा दुकानांसह रहाट पाळण्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा कडक सूचना छावणी परिषदेच्या सीईओ आकांक्षा तिवारी यांनी कंत्राटदार गंगाधर जाधव यांना दिल्या आहेत. सीईओ यांनी गुरूवारी, २६ सप्टेंबर रोजी तब्बल दीड तास यात्रास्थळाची पाहणी केली. नवरात्रोत्सवाला ३ ॲाक्टोबर पासून सुरूवात होणार आहे. या निमित्ताने तिथे यात्रा भरते. यासाठी छावणी परिषदेने निविदा प्रक्रिया राबवली होती. हा कंत्राट गंगाधर जाधव यांना ९० लाखांत देण्यात आला आहे. या यात्रेच्या निमित्ताने टीम ॲाफ असोसिएशन्सने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र देवून यात्रेचे काय नियोजन आहे, स्वच्छता आणि सुरक्षा कशी असेल हे निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर छावणी परिषदेच्या सीईओ आकांक्षा तिवारी यांनी टी ॲाफ असोसिएशन्स आणि कंत्राटदार यांना बोलावून यात्रास्थळाची पाहणी केली. यात भाविकांसाठी ५० शौचालय उभारा, ५० फूटांचा रस्ता मोकळा सोडा, रस्त्यावर एन्ट्री एक्झिटचे बांबूनी सर्कल करा. ठिकठिकाणी त्यासाठी रस्ते ठेवा, नाश्त्याची कॉलिटी चांगली ठेवा, करचा तात्काळ उचलला गेला पाहिजे, पाणी शुद्ध ठेवा, ज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे परवाना असेल त्यांनाच नाश्त्याची दुकान लावण्यास जागा द्या, सीसीटीव्ही लावा, लाईट गेल्यास जनरेटरची व्यवस्था करा, अशा विविध सूचना सीईओ आकांक्षा तिवारी यांनी दिल्या. तसेच महिलांच्या सूरक्षेसंदर्भातही पोलिस प्रशासनाची चर्चा करणार आहे, असे तिवारी यांनी सांगितले.
Source link