युवा सेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेल गुरवारी जल्लोषात सुरुवात झाली. बालगंधर्व रंगमंदिरात दि. 26 ते दि. 28 सप्टेंबर या कालावधीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे दुस
.
स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते माधव अभ्यंकर आणि सुनील गोडबोले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नटराज, रंगभूमी पूजन, दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. युवा सेनेचे महाराष्ट्र सचिव किरण साळी, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, युवा सेनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आणि स्पर्धेचे संयोजक कौस्तुभ कुलकर्णी, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, युवा सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश जोशी, युवा सेना पुणे जिल्हा समन्वयक सागर पाचर्णे तसेच स्पर्धेचे सहसंयोजक कुणाल शहा, अजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परिक्षक विनिता पिंपळखरे, अनुपमा कुलकर्णी, प्रदीप रत्नपारखी रंगमंचावर होते. या प्रसंगी विश्वजीत बारणे यांच्या हस्ते करंडक आणि ट्रॉफिचे अनावरण करण्यात आले.
स्पर्धेत 31 संघांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेची सुरुवात मएसोच्या आयएमसीसीने सादर केलेल्या ‘सखा’ एकांकिकेने झाली.
विजेत्या संघास 51 हजार रुपये, करंडक आणि मेडल, द्वितीय क्रमांकास 31 हजार रुपये, सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकास 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजनेसाठी पारितोषिके दिली जाणार आहेत.
मान्यवरांचे स्वागत कौतुभ कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन भाग्यश्री कुलकर्णी यांनी केले.
दि. 27 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळात तर दि. 28 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळात एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.
शनिवारी पारितोषिक वितरण समारंभ
एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. नाट्य क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या राधिका देशपांडे, ऋतुजा देशमुख, राहुल रानडे व प्रदिप वैद्य या कलाकारांचा या वेळी विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे तर ज्येष्ठ कलाकार श्रीराम रानडे यांना जीवनगौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
