माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन: यकृताशी संबंधीत आजारावर सुरू होते उपचार, निलंबनाच्या कारवाईलाही जात होते सामोरे – Nagpur News



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे गुरुवारी उपचारादरम्यान निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. कुलगुरू निवासाहून अंत्ययात्रा निघून अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक वर्तुळातील अनेक मान्य

.

सुभाष चौधरी (जन्म 18 मे 1965) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली होता. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव होता. 8 ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा सांभाळली होती.

सायन्स काँग्रेस, शताब्दी सोहळा हे प्रमुख योगदान

मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवी सोहळा हा कुलगुरू चौधरींच्या काळात झाला. या सोहळ्याच्या निमित्त वर्षभर विविध उपक्रम विद्यापीठामध्ये राबवण्यात आले. यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यासोबतच जानेवारी 2023 मध्ये नागपूर विद्यापीठात सुभाष चौधरी यांच्या नेतृत्वात इंडियन सायन्स काँग्रेसचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

निलंबनाची कारवाई सुरू होती

डॉ. सुभाष चौधरी यांना 21 फेब्रुवारी 2024 रोजी कुलपतींनी निलंबित केले होते. मात्र, निलंबन करताना अपेक्षित कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने डॉ. चौधरींचे निलंबन रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी 11 एप्रिलला पुन्हा पदभार स्वीकारला. परंतु, यानंतर लगेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्या समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर कुलपतींनी चौधरी यांना 4 जुलै ला कुलपतींनी दुसऱ्यांदा निलंबित केले होते. यासंदर्भात कारवाई सुरू होती.

डॉ. चौधरी यकृताशी संबंधित आजारावर मागील काही महिन्यांपासून एका खासगी दवाखान्यात उपचार घेत होते. शुक्रवारी रात्री प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबई येथे नेण्याचा निर्णय निकटवर्तीयांनी घेतला. त्यानुसार, “एअर अॅम्ब्युलन्स इंडिया’ या कंपनीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी 7 लाख रुपयांचा भरणाही कंपनीकडे करण्यात आला. कंपनीने शनिवार 21 रोजी सकाळी 8.30 वाजता एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, एअर अॅम्ब्युलन्सच्या वेळेमध्ये कंपनीने वारंवार बदल केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24