संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबियांवर 27 आरोप केले. यात एकाचीही तक्रार केली नाही, किंवा कागदपत्रे दिले नाही, म्हणून आम्ही निर्णय घेतला की कोणतेही एक प्रकरण घेऊन आम्ही न्यायालयात जाऊ. यानंतर आम्ही युवक प्रतिष्ठाणच्या शौचालय बांधकाम प्रकरणी मेधा सोमय्या
.
दरम्यान किरीट सोमय्या पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांना 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम तक्रारदार प्रोफेसर डॉ. मेधा सोमय्या यांना दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मेधा सोमय्या काय म्हणाल्या?
मेधा सोमय्या म्हणाल्या की, राज्यात कुणी बेताल वक्तव्य करणार असेल तर एक शिक्षिका, समाजसेविका म्हणून मी हे सहन करणार नाही. तेच उदाहरण मी समाजापुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या संस्थेवर कुणी डाग लावणार असेल तर मी त्यासाठी उभे राहील असे मेधा सोमय्या यांनी म्हटले आहे. न्यायलयाने माझी बाजू ऐकून घेत मला न्याय दिला याचा खूप आनंद होत आहे, न्यायव्यवस्थेवरील विश्वास हा आज वाढला, असे मेधा सोमय्या यांनी म्हटले आहे.
गुन्हा करणाऱ्याला शिक्षा होणारच- गुप्ता
सोमय्यांचे वकील कनक आणि विवेकानंद गुप्ता म्हणाले की,आजची जजमेंट स्वागतार्ह आहे. जस्टिस कॅन बी डिले, बट नॉट डिनाय, हे आजच्या निकालातून दिसले. मी सेल्युट करतो. प्रत्येकजण कायद्यासमोर समान आहे, हे सिद्ध झाले. तुम्ही पदावर आहात म्हणून कुठल्याही न्यायालयीन सेक्शनच, तरतुदीच उल्लघंन करता येणार नाही हे स्पष्ट झाले.
काय आहे शौचालय घोटाळा?
वर्ष 2022 मध्ये मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. या कामात बनावट कागदपत्र सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मेधा सोमय्यांवर खासदार संजय राऊत यांनी केला होता. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबानेच केलेला हा घोटाळा असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता.
राऊतांनी काळजी घ्यावी – बावनकुळे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय सर्वांनी स्वीकारला पाहिजे. त्यानुसारच पुढे गेले पाहिजे. तसेच संजय राऊत यांनी आता अशाच चुका पुन्हा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. इतरांनीही याबाबत काळजी घ्यायला हवी.
संजय राऊत शिक्षेला आव्हान देणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टाने त्यांना ठोठावलेल्या 15 दिवसांच्या शिक्षेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात. त्यानंतर आमच्यासारख्या भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या लोकांना न्याय कुठून मिळणार? आम्हाला हा निर्णय अपेक्षितच होता. आम्ही त्याला वरच्या कोर्टात आव्हान देऊ, असे ते म्हणालेत.
न्यायव्यवस्था कुणाची तरी रखेल झाली
संजय राऊत पुढे म्हणाले, शाहीर अण्णाभाऊ साठे ही न्यायव्यवस्था कुणाची तरी रखेल झाले असे म्हणाले होते. हे स्पष्टपणे दिसत आहे. पण त्यानंतरही आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. आम्ही या आदेशांना वरच्या कोर्टात आव्हान देऊ. पण न्यायव्यवस्था कुणाची तरी रखेल झाली हे स्पष्ट आहे. वाचा सविस्तर