सरकारची भावना सावत्र भावाप्रमाणे स्वार्थीच: भाजप आमदाराच्या लाडकी बहीण योजनेवरील मुक्ताफळांवरून रोहित पवारांचा हल्लाबोल – Pune News



विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चेबांधणी सुरू आहे. विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे घेतले जात आहेत. सत्ताधाऱ्यांच्या वतीने शासन राबावत असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली जात आहे. तर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

.

काय म्हणाले रोहित पवार ?

रोहित पवार यांनी सोशल मिडियावर आमदार सावरकरांच्या व्यक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट करत महायुतीला डिवचले आहे, ‘केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजनेचा जुगाड केल्याचे’ खुद्द भाजपा आमदारांनीच सांगितले आहे, सरकार मतांसाठी लाडकी बहीण म्हणत असले तरी सरकारची भावना मात्र सावत्र भावाप्रमाणे स्वार्थीच असल्याचे यावरून स्पष्ट होते, अशी टीका रोहित पवारांनी केली.

त्रुटी दूर करून योजना अधिक सक्षमपणे राबवणार

सावत्र भावांनी केवळ मतांसाठी योजना आणली असली तरी महाविकस आघाडी सरकार या योजनेतील त्रुटी दूर करून भरघोस निधीची तजवीज करून योजना अधिक सक्षमपणे राबवेल. तसेच लाडक्या बहिणींना सुरक्षा, त्यांच्या मुलामुलींसाठी नोकऱ्या, शेतमालाला चांगला भाव यासारख्या महत्वपूर्ण गोष्टी ज्या स्वार्थी सावत्र भावांच्या सरकारमध्ये नाहीत त्यावर सुद्धा मविआ सरकार काम करेल, असेही रोहित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते टेकचंद सावरकर?

आम्ही इतकी मोठी भानगड कशासाठी केली? हे तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरासमोर मतदानाची पेटी येईल. त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणी भाजपला मतदान करतील, यासाठी आम्ही हा जुगाड केलाय. हे सर्वजण खोटे बोलले असतील. मात्र, मी खरे बोलतो. माझे बोलणे खरे आहे की नाही? नाहीतर बोलायचे एक आणि करायचे एक, असे करायला मी रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का? असे टेकचंद सावरकर यांनी म्हटले होते.

टेकचंद सावरकरांनी दिले स्पष्टीकरण

एका मेळाव्यातील माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला. माझा असा कोणताही हेतू नव्हता. लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे. मी एकट्याने काही म्हटले तर काहीही होणार नाही. काँग्रेसकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काही नसल्यामुळे काँग्रेसने माझ्या भाषणातील तेवढीच क्लिप व्हायरल केली, असे स्पष्टीकरण टेकचंद सावरकर यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24