‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया!’ हे गाणे तोंडून निघाले की सर्वात आधी देव आनंद यांची आठवण येते. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पहिला चॉकलेट बॉय म्हणून देव आनंद हे ओळखले जायचे. तसेच विशिष्ट पद्धतीने मान वाकडी करुन वावरणाऱ्या देव आनंद यांनी हिंदी सिनेसृष्टीमधील एक काळ प्रचंड गाजवला होता. देव आनंद यांचे आयुष्य कमालिचे होते. ते सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. मात्र वृद्धापकाळात केला जाणारा ‘देवसाहब’ हा उल्लेख त्यांना कधीच आवडला नाही. आज देव आनंद यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी…