Swatantrya Veer Savarkar: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट ऑस्कर २०२५मधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. ही बातमी ऐकून चाहत्यांना आनंद झाला, पण त्याचवेळी काही लोकांनी यावर प्रश्नही उपस्थित केले. मात्र, आता ही माहिती खोटी असल्याचे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. ऑस्करसाठी भारतातून अधिकृतरित्या ‘लापता लेडीज’ हा चित्रपट पाठवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.