दारूच्या अंमलाखाली एका व्यक्तीने आपल्या बहिणीच्या नवऱ्यास ठार केल्याची भयंकर घटना पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे एमआयडीसीत घडली आहे.
.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनंदन सारा (वय-२६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून ताे मिळचा बिहार राज्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी आराेपी प्रमाेद कुमार (२३, मु.रा. खापिती, जि.मधेपुरा, बिहार) याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी आराेपी प्रमाेद कुमार याच्यावर तळेगाव दाभाडे एमआयडीसी पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व आराेपी हे दाेघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. मृत अभिनंदन सारा हा आराेपी प्रमाेद कुमार याचा बहिणीचा पती होता. ते बिहार राज्यातील मधेपुरा जिल्हयातील खपिती या एकाच गावचे रहिवासी आहेत. कामाच्या निमित्ताने ते बिहार येथून दाेन महिन्यापूर्वी दाेघे एकत्रित तळेगाव दाभाडे एमआयडीसी राहण्यास आले होते.
एमआयडीसीत साेम कन्स्ट्रक्शन माध्यमातून ठेकेदाराचा माध्यमातून नानाेली येथे एका आयआयटी बांधकाम साईटवर मजुरीचे ते काम करत हाेते. दरदिवशी ५०० रुपये राेजंदारीवर त्यांचे काम सुरु हाेते व मजुर वसाहतीत ते रहाण्यास हाेते. रविवारी रात्री दाेघांनी जेवण करुन दारुचे सेवन केले हाेते. त्यानंतर प्रमाेद कुमार याने अभिनंदन याच्याकडे १०० रुपये उधार मागितले हाेते. परंतु त्याने पैसे उधार देण्यास नकार दिला हाेता. त्यामुळे राग आलेल्या प्रमाेद याने दारुच्या नशेत जवळचा एक पडलेला दगड उचलून ताे अभिनंदन याच्या डाेक्यात मारुन त्यास रक्तबंबाळ करत त्याचा जीव घेतला.
या प्रकरणाची माहिती पाेलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी दाखल हाेत मयताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच आराेपीचा शाेध घेऊन त्याला ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पाेलिस करत आहेत.