सध्या मालिका विश्वात जणू काही धुमाकूळ सुरु आहे. एकापाठोपाठ एक अशा नव्या मालिकांची घोषणा सुरु आहे. पण या मालिकांचे विषय हे अतिशय वेगळे आणि उत्सुकता वाढवणारे असल्याचे प्रोमो पाहिल्यावर सिद्ध होते. अशातच कलर्स मराठी वाहिनीवर आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत एक लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. पण ही लव्हस्टोरी थोडी वेगळी आहे. कारण या कपलमध्ये प्रचंड द्वेष असणार आहे. आता ही आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.