आज गुरुवार १९ सप्टेंबर रोजी, चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीया तिथी असून, या तिथीला द्वितीया तिथीचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षाच्या दुसऱ्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार पितृ पक्षाच्या द्वितीया तिथीला ५ राशींना शुभ योगाचा लाभ होणार आहे.