Rahul Gandhi on Narendra Modi : अमेरिकेच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला अनेकदा सहानुभूती वाटते. तुम्हा लोकांना आश्चर्य वाटेल, पण मी मोदींचा द्वेष करत नाही. मी सकाळी उठतो आणि विचार करतो की त्यांची मते वेगळी आहेत तर माझी मते काहीशी वेगळी आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही, परंतु मी त्याचा तिरस्कार करत नाही. मला राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा लढतीचं कोणतही कारण दिसत नाही. मी त्याला माझा शत्रू देखील मानत नाही.