भारतात Mpox चा पहिला रुग्ण confirmed! विलगीकरणातील रुग्णाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या धोकादायक व्हायरस एमपॉक्स किंवा मंकीपॉक्सची भारतात एंट्री झाली आहे. भारतात या व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. या व्हायरसने संक्रमित पुरुषाने नुकतीच एमपॉक्स संक्रमित देशात प्रवास केला होता. त्याला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार संक्रमित व्यक्तीची प्रकृती स्थिर असून अजूनपर्यंत त्याच्यात व्हायरसचे तीव्र लक्षण दिसून येत नाहीत. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेल्या आरोग्य आणीबाणीचा हा भाग नाही. मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीच्या तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णामध्ये पश्चिम आफ्रिकी क्लॅड २ च्या एमपॉक्स व्हारसरची लक्षणे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24