About Us

आमच्याबद्दल – 

आजकालच्या वेब बातम्यांच्या जगात उठसुठ कुठलीही गोष्ट उचलून त्याची उगाच बातमी करणे हा आमचा मूळ उद्देश मुळीच नाही.  चांगल्या आणि योग्य शब्दात मांडणी असलेल्या बातम्या तसेच सकारात्मकत्याच्या दृष्टीने कल वाढवणाऱ्या बातम्या, अचूक माहिती देणे, हाच आमचा उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. स्वत: देव, देश आणि धर्माचे पुरस्कर्ते असताना इतर जाती-धर्माचा आदर पुरेपुर करतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक जबाबदारीची विश्वासात्मक भूमिका आहे. 

मराठी भाषा, मराठी माणुस आणि मराठी राष्ट्र हिताची वृध्दी, प्रगती आणि समृध्दी हेच उदिष्ट आहे. राजकारण ते समाजकारण, व्‍यवसाय ते उद्योग आणि प्रशासनापासुन सरकारपर्यंत मराठी मुलुखाच्या सोबत राहू. माध्यमांचा फायदा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवून शिक्षण-आरोग्य-रोजगारासारख्या अत्यावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष काम करु. समाजाशी संबंधित प्रश्न आणि गरजा यावर वास्तववादी तोडगा काढू. अर्थव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आणि निरोगी समाजव्‍यवस्थेसाठी आमचे योगदान मजबूत असेल.. 

विविध विषय आणि क्षेत्रांतील बातम्या, माहिती, विशेष अहवाल, तज्ञांच्या मुलाखती या दृक-श्राव्य माध्यमात आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. जगभरातील संधी मराठी माणसांपर्यंत पोहचविली जाईल. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शनही उपलब्ध असेल. आम्हाला काय वाटतं यापेक्षा वाचक – दर्शक – श्रोत्यांना जे हवं, जे हिताचं, उपयोगाचं, ते दिलं जाईल. समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीला उभं राहून, समाजाला आमचा आधार वाटायला हवा असा मानस आहे. वेब आणि समाज माध्यमांवर प्रस्थापित होणे, यावा आमचा जास्तीत जास्त भर आहे.

zeus casino