5 तासांचा प्रवास 90 मिनिटांत पूर्ण होणार! 1400 कोटींचा खर्च होणार, महाराष्ट्र सरकारचा नवा प्रकल्प


Maharashtra News: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराला आता थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येत आहे. राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या दरम्यान या प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यांनी विधानसभेत म्हटलं की, साधारण या प्रकल्पासाठी 14 हजार कोटींचा खर्च होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. या प्रकल्पाचा विस्तृत डीपीआर तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे

Add Zee News as a Preferred Source

5 तासांचे अंतर दीड तासांवर

मंत्री दादा भुसे यांनी दावा केला आहे की, या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळं पालघर ते समृद्धी महामार्गापर्यंत प्रवास करणे अधिक सोप्पे जाणार आहे. त्यांनी सभागृहात म्हटलं आहे की, या प्रकल्पामुळं प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होऊन फक्त दीड तासांवर येणार आहे.

काय आहे हा प्रकल्प?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी बुधवारी विधानसभेत वाढवण बंदर आणि समृद्धी माहामार्गाला जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना मंत्री भुसे यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर सांगितले होते. या प्रकल्पामुळं पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि त्र्यंबकेश्वरमधून जाऊन इगतपुरीहून समृद्धी महामार्गाला जोडणार आहे.

या प्रकल्पामुळं या परिसराचा विकास होणार असून अर्थव्यवस्थेलाही बळकटी येईल. त्यांनी पुढे म्हटलं की, वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा हा फ्रेट कॉरिडोर सहा लेनचा असून यावर वाहने 100 किमी प्रतितास वेगाने चालवू शकणार आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प महाराष्ट्रातील किनारा क्षेत्रातील आंतरिक क्षेत्रातील भागांना जोडेल.

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ बांधण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या वाढवण बंदर प्रकल्पाची एकूण किंमत 76,220 कोटी आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 12 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या वाढवण बंदरात नऊ कंटेनर टर्मिनल असतील, प्रत्येकी 1,000 मीटर लांबीचे. त्याची क्षमता प्रतिवर्ष 298 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) असेल. पूर्ण झाल्यावर, वाढवण बंदर जगातील टॉप टेन बंदरांमध्ये समाविष्ट होईल.

FAQ

हा प्रकल्प नेमका काय आहे?

हा पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला थेट समृद्धी महामार्गाशी जोडणारा सहा लेनचा फ्रेट कॉरिडॉर (मालवाहतूक मार्गिका) प्रकल्प आहे.

प्रकल्पाचा उद्देश काय आहे?

पालघर आणि समृद्धी महामार्ग (इगतपुरी) दरम्यानचा प्रवासाचा आणि मालवाहतुकीचा वेळ कमी करणे, परिसराचा विकास करणे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत किती कपात होणार आहे?

मंत्री दादा भुसे यांच्या दाव्यानुसार, सध्याचा सुमारे चार ते पाच तासांचा प्रवासाचा वेळ कमी होऊन तो केवळ दीड तासांवर येण्याची शक्यता आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *