![]()
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा दिला आहे. अर्ज भरताना किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना अनावधानाने झालेल्या चुका सुधारण्यासाठी आता राज्य सरकारने अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. त्य
.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या ग्रामीण आणि दुर्गम भागातील आहेत. अनेकदा तांत्रिक माहितीचा अभाव, नेटवर्कच्या समस्या किंवा घाईगडबडीमुळे ई-केवायसी करताना महिलांकडून चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. अशा चुकांमुळे अनेक पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर, ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळावी, अशी मागणी करणारी अनेक निवेदने महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाली होती. या मागण्यांची गंभीर दखल घेत आणि महिलांच्या सोयीसाठी सरकारने हा संवेदनशील निर्णय घेतला आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर जाऊन महिलांना त्यांच्या ई-केवायसी अर्जात ‘एकदाच’ सुधारणा करता येईल. ही शेवटची संधी असल्याने महिलांनी काळजीपूर्वक माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विधवा आणि पितृछत्र हरपलेल्या महिलांसाठी दिलासा
केवळ केवायसी नोंदणीसाठी मुदतवाढच नाही, तर विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण तांत्रिक बदल केला आहे. ज्या लाभार्थी महिलांचे पती हयात नाहीत किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत, अशा महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणी येत होत्या. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या घटकातील महिलांनाही आता आपली नोंदणी प्रक्रिया विनासायास पूर्ण करता येणार आहे.
महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध
सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या उदात्त हेतूने राबविण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे किंवा छोट्याशा चुकीमुळे कोणत्याही पात्र लाडक्या बहिणीला लाभापासून वंचित राहावे लागू नये, हीच शासनाची भूमिका आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे, असे अदिती तटरकरे यांनी म्हटले आहे.