कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात 15 डिसेंबरपर्यंत बदल



कोकण रेल्वेच्या (konkan railway) प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. या मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. पुढील काही दिवस हे बदल कायम राहणार आहेत.

दिवा (diva)-पनवेल (panvel) मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकावर दोन नवीन क्रॉसओव्हरचे (crossover) काम सुरू आहे. तसेच ते सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

त्यामुळे मध्य रेल्वेने 10 ते 15 डिसेंबरदरम्यान प्री-एनआय आणि एनआय ब्लॉक जाहीर केला आहे.

तळोजा पंचनंद येथे सुरू असलेल्या क्रॉसओव्हर कमिशनिंगदरम्यान सिग्नल आणि मार्गरचना सुधारण्यासाठी काही गाड्या उशिराने सोडणार आहेत.

या ब्लॉकमुळे मुंबईकडे येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

15 डिसेंबरपर्यंत हे बदल प्रभावी राहणार आहेत. काही गाड्यांच्या उशीरा निघणार आहेत. मडगाव-मुंबई CSMT एक्स्प्रेस (20112) ही गाडी 30 मिनिटे उशिरा सुटणार आहे.

तिरुवनंतपुरम नॉर्थ–एलटीटी एक्स्प्रेस 60 मिनिटांनी, तर मंगळुरू–मुंबई CSMT एक्स्प्रेस 50 मिनिटांनी उशिरा धावणार आहे.

त्याचबरोबर, 14 डिसेंबरला सुटणारी मडगाव–मुंबई CSMT एक्स्प्रेस (20112) 60 मिनिटांच्या उशिराने धावेल.

तर 15 डिसेंबर रोजी सुटणारी मुंबई CSMT-मडगाव एक्स्प्रेस (10103) 30 मिनिटांच्या उशिराने निघेल.

सुरू असलेल्या तांत्रिक कामांमुळे मार्गावरील गाड्यांची क्रॉसिंग क्षमता वाढणार आहे. वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

हे बदल लक्षात घेऊनच प्रवाशांनी नियोजन कराण्याची रेल्वे प्रशासनानी विनंती केली आहे. मुंबईवरून सुटणाऱ्या या गाड्यांना नेहमी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांचा खूप खोळंबा होणार आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *