Company Runs With 42 Employees Earns 63280 Crore: एखादी कंपनी जर 63280 कोटींची कमाई करत असेल तर ती अती भव्य असली पाहिजे. म्हणजे काही शे ठिकाणी कर्मचारी, हजारो कर्मचारी, मोठं ऑफिस वगैरे सारख्या गोष्टी असतील तरच एवढी मोठी कमाई कंपनीला करता येईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. अवघ्या 9 वर्षांपूर्वी सुरु केलेल्या या कंपनीमध्ये केवळ 42 कर्मचारी आहेत असं तुम्हाला सांगितलं तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ही कंपनी कोणती आणि काय काम करते ते पाहूयात…
40 कोटी ग्राहक अन् 42 कर्मचारी
आपण ज्या कंपनीबद्दल बोलतोय तिच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, केली ब्लेअर! त्यांनीच हा खुलासा केला आहे की जगभरात 40 कोटींहून अधिक युझर्स त्यांच्या कंपनीची सेवा वापरतात. एवढे युझर्स असलेल्या या कंपनीची एक सोशल मीडिया साईट आहे. या साईटवर जवळपास 40 लाख कंटेट क्रिएटर्स आहेत. बरं हा सारा पसारा मॅनेज करतात ते फक्त 42 कर्मचारी. आता ही नेमकी कंपनी कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर ही कंपनी अडल्ट कंटेंट पुरवणारा प्लॅटफॉर्म चालवते.
ही कंपनी कोणती आहे? काय काम करते?
ज्या प्लॅटफॉर्मबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे, ओन्लीफॅन्स! लिस्बनमध्ये नोव्हेंबर वेब समिटदरम्यान जेफ बर्मनशी मास्टर्स ऑफ स्केल पॉडकास्टवर बोलताना केली ब्लेअरने कंपनीने जाणूनबुजून कमकुवत साचा असलेली रचना केल्याचं सांगितलं. कंपनीने मधल्या फळीतील व्यवस्थापन करणाऱ्या प्रोफाइल काढून टाकण्याचा निर्णय जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या धोरणाअंतर्गत घेतला आहे. तिने या दृष्टिकोनामागील तत्वज्ञान नेमकं काय आहे हे स्पष्ट केले.
नऊ वर्षात घसघशीत यश
2016 मध्ये स्थापन झालेला ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शनवर आधारित कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मममधून कंपनीला वार्षिक सुमारे 7 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्न मिळते. भारतीय चलनानुसार ही रक्कम 63280 कोटी 07 लाख रुपये इतकी होते. बर्मनने कंपनीच्या कर्मचार्यांच्या कमी आकारमानामुळे कंपनीचे उत्पादन ‘खूप शक्तिशाली’ असल्याचे नमूद केलं आहे. ‘बिझनेस इनसाइडर’च्या अहवालानुसार, ब्लेअरने तिच्या टीमला ‘खूप कार्यक्षम ग्रुप’ असल्याचं म्हटले आहे.
कंपनीत कशी होते कर्मचारी भरती?
ब्लेअरने कंपनीमध्ये कर्मचारी भरतीचे तत्वज्ञान स्पष्ट केले आहे. “आम्ही अविश्वसनीयपणे उच्च स्तरावरील प्रतिभावान व्यक्तींनाच नियुक्त करतो. त्यानंतर आम्ही काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी असलेल्या कनिष्ठ प्रतिभावान व्यक्तींची नियुक्त करतो. आम्ही अनुभवाऐवजी भरतीमध्ये वृत्ती आणि योग्यता शोधतो,” असं ब्लेअरने सांगितलं. ती पुढे म्हणाली, “आमच्याकडे संघटनात्मक बांधणीत मीड लेव्हलला अस्थिर मध्यम मॅनेजमेंट लेअरच नाही, कारण माझ्या अनुभवात कोणीही खरोखर चांगल्या दर्जाचा मध्यम स्तरावरील व्यवस्थापक नव्हता,” असं ब्लेअरने प्रांजळपणे सांगितलं.
कंपनीचे तत्वज्ञान काय?
ब्लेअर यांनी असा युक्तिवाद केला की अनेक मोठ्या संस्था त्यांच्याकडे रिपोर्ट करणाऱ्या लोकांच्या संख्येवरून कंपनीत नेतृत्व करणाऱ्यांचे चुकीचे मूल्यांकन करतात. ओन्लीफॅन्समध्ये, टीमचा आकार नव्हे तर कामगिरी यश निश्चित करते, असं ब्लेअरने सांगितलं.
“आम्ही आमच्या टीम्सला सांगितले आहे की, ‘तुम्ही एक टीम असू शकता आणि अपवादात्मक निकाल देऊ शकता. हे असं करणं खूप मौल्यवान असेल,” असं ब्लेअर म्हणाली. कंपनीत करिअर प्रगतीसाठी कोणताही ‘व्यवस्थापक ट्रॅक’ नाही. ओन्लीफॅन्समधील प्रत्येक कर्मचारी वैयक्तिक योगदानकर्ता आहे, असे ब्लेअर म्हणाली. वकील म्हणून अनेक वर्षे काम केल्यानंतर 2023 मध्ये ओन्लीफॅन्सची सीईओ झालेल्या ब्लेअरने प्लॅटफॉर्मची ओळख देखील करुन दिली.
मधल्या फळीत कर्मचारी कपात
तिने मुलाखतीत सांगितले की, ओन्लीफॅन्सचे जगभरात 40 कोटी वापरकर्ते आणि 40 लाख कंटेंट क्रिएटर्स आहेत. तिने हे देखील मान्य केले की कंपनीची संघटनात्मक रचना बिग टेक कंपन्यांमधील व्यापक ट्रेंडकडे लक्ष वेधते. अलिकडच्या काही वर्षांत मध्यम-व्यवस्थापन पदांवर कपात झाल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न ब्लेअरने केला.
पैशांचा व्यवहार कसा होतो?
यावर 40 लाखांपेक्षा जास्त क्रिएटर्स सक्रिय आहेत. हे क्रिएटर्स मुख्यतः अडल्ट कंटेंटसाठी (लैंगिक सामग्री) प्रसिद्ध आहेत. जरी फिटनेस, संगीत, कुकिंग यासारख्या इतर क्षेत्रांसाठीही हा प्लॅटफॉर्म वापरला जात असला तरी प्रामुख्याने अडल्ट कंटेंट यावरुन पाहिला जातो. क्रिएटर्स त्यांचा एक्सक्लुझिव्ह कंटेंट अपलोड करतात आणि सबस्क्राइबर्सकडून पैसे घेतात. प्लॅटफॉर्म 20% कमिशन घेते आणि उरलेले पैसे क्रिएटरला मिळतात. यूजर्स क्रिएटर्सच्या पेजवर सबस्क्राइब करून कंटेंट पाहू शकतात. हे पेवॉलच्या मागे असते, म्हणजे फ्री नाही.