फक्त ₹6 लाखांत घरी आणा ‘ही’ 7 सीटर कार; उत्तम सस्पेंशन अन् इंजिन… कुटुंबाला वाटेल तिथं फिरायला न्या!


Auto News 7 Seater Budget Car : मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास परदेशी कंपन्यांनी आपला भारतातील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी नवनवीन मॉडेल देशात सादर केले. प्रामुख्यानं भारतातील रस्ते आणि येथील नागरिकांच्या इतर गरजा लक्षात घेऊन कार उत्पाकद कंपन्यांनी त्या अनुषंगानं काही डिझाईन सादर केले. यामध्ये अनेक मध्यमवर्गीय खरेदीदारांकडून सहसा फॅमिली कारला प्राधान्य दिलं जातं. अर्थात एक अशी कार ज्यामध्ये किमान 5 ते 6 जणांची आसनक्षमता असेत. 

Add Zee News as a Preferred Source

आता थेट 7 सीटर कार, तिसुद्धा परवडणाऱ्या दरात; नाव माहितीये? 

काही मंडळी थेट 7 सीटर कार खरेदीचा प्रयत्न करतात. पण, या श्रेणीतील कारच्या किमती पाहता हे स्वप्न साकारण्याचा कालावधी मात्र वाढतो. आता मात्र ही प्रतीक्षा करण्याचीसुद्धा गरज नाही. कारण, नवीकोरी कॉम्पॅक्ट MPV भारतात लाँच होणार असून, 18 डिसेंबर 2025ला प्रत्यक्षात ही कार भारतीयांसमोर असेल. अनेक चाचण्यांमधून पुढं आलेली ही कार म्हणजे रेनॉ-निसान अलायन्सअंतर्गत तयार झालेली दुसरी बॅज इंजिनिअर्ड प्रोडक्ट म्हणून विकली जाणार आहे. 

एक नवी ओळख आणि अधिक फिचर रिच ऑफरिंग देण्याचा प्रयत्न या निमित्तानं निसान करणार असून ती ‘सब कॉम्पॅक्ट MPV’ रेंजमध्ये प्रवेश करेल. भारतात ही कार थेट प्रचंड विक्री होणाऱ्या मारुती अर्टिगा आणि रेनॉ ट्रायबरसह, किया कॅरेन्स अशा कारना टक्कर देणार आहे. कारची पहिली झलक अद्याप समोर आली नसली तरीही कंपनीकडून दाखवण्यात आलेल्या सावलीवजा फोटोमध्ये कार साधारण रेनॉ ट्रायबरसारखी असेल असा अंदाज लावण्यात येत आहे. 

MPV हेक्सागोनल इंन्सर्टसह एक मोठी ग्रिल, नवे हेडलँप युनिट, फ्रंट बम्परमध्ये इंटिग्रेटेड C शेप्ड एक्सेंट यांमुळ कारला एक आक्रमक लूक मिळेल. नवे अलॉय व्हील आणि फंक्शनल रुफ रेलसह कारमध्ये टेल लँप डिटेलिंगसुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळं हे बदल कारला आणखी कमाल ठरवत आहेत. 

जाणकारांच्या मते या कारमध्ये 7 इंचांचं टीएफटी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 8 इंचांचं इन्फोटेन्मेंट, एक वायरलेस चार्जिंग पॅड, कूल्ड सेंटर स्टोरेज, स्लायडिंग/रिक्लायनिंग सेकंड रो सीटसह ही कार 5, 6 आणि 7 सीटर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. 

कारमध्ये एएमटी गिअरबॉक्स

1.0 लीटर, 3 सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन कारमध्ये 72 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करेल. कारमध्ये एएमटी गिअरबॉक्स मिळणार असून, उत्तम ड्रायव्हिंगसाठी इंजिन आणि गिअरबॉक्सला ट्यून केलं जाऊ शकतं. एक स्वस्त, मोठी आणि आरामदायी 7 सीटर कार शोधत असणाऱ्यांसाठी निसानची ही कार उत्तम पर्याय ठरु शकते ज्यासाठी 5.76 लाख ते 6 लाखांपर्यंतची किंमच निश्चित होऊ शकते. त्यामुळं कुटुंबासाठी खिशाला परवडेल अशी एखादी चांगली कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही कार एक उत्तम पर्याय आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *