Hybrid cars mileage : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत चाललेल्या किमतीमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक आणि CNG कार घेण्याकडे वळत आहेत. मात्र, या दोन पर्यायांना टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारपेठेत अजून एक जबरदस्त पर्याय उभा राहिला आहे. तो म्हणजे हाइब्रिड कार.
या कार इलेक्ट्रिक आणि पारंपरिक ICE इंजिनमध्ये आहेत. Maruti Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder आणि Honda City e:HEV या सारख्या हायब्रिड कार 25 ते 28 किमी इतका दमदार मायलेज देतात.
पेट्रोल कारच्या तुलनेत 20-30% जास्त मायलेज
हाइब्रिड कार सामान्य पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा खूप वेगळ्या असतात. त्या दोन पॉवर सोर्स वापरतात. पेट्रोल/डिझेल इंजिन (ICE) इलेक्ट्रिक मोटर. मजबूत हाइब्रिड सिस्टममध्ये इलेक्ट्रिक मोटरकडे कारला स्वतंत्ररीत्या चालवण्याची क्षमता असते. कमी वेगात, ट्रॅफिकमध्ये किंवा जिथे इंजिनवर ताण नसतो तिथे कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडमध्ये धावते.
यातील एक खास फिचर म्हणजे रीजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम. कार मंदावताना किंवा ब्रेक लावताना निर्माण होणारी ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. त्यामुळे इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्रितपणे काम करत असल्याने इंधनाची बचत मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पेट्रोल कारच्या तुलनेत 20-30% जास्त मायलेज मिळणे हीच हाइब्रिड कारची सर्वात मोठी ताकद आहे.
भारतातील लोकप्रिय हायब्रिड कार
1. Maruti Suzuki Grand Vitara (Strong Hybrid) मायलेज 27.97 किमी. एक फुल टँकमध्ये 1200 किमीपेक्षा जास्त अंतर पार करते.
फिचर्स: सनरूफ, 360° कॅमेरा, स्मार्ट हायब्रिड सिस्टम
2. Toyota Urban Cruiser Hyryder (Strong Hybrid) मायलेज 27.97 किमी. फुल टँकमध्ये 1200 किमीपेक्षा जास्त अंतर जाते.
फिचर्स: ADAS, इलेक्ट्रिक ड्राइव्ह मोड, प्रीमियम इंटिरिअर
3. Honda City e:HEV (Sedan Segment) मायलेज 26.5 किमी.
फिचर्स: ADAS, ई-सीव्हीटी, जबरदस्त स्मूथ ड्राइव्ह
या तिन्ही कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच सुरक्षा, कंफर्ट आणि प्रीमियम फीचर्स उत्तम पाहायला मिळतात. पेट्रोलच्या दरवाढीला पर्याय म्हणून ग्राहक EV किंवा CNG कडे पाहत असले तरी हाइब्रिड कार हा पर्याय अधिक उपयुक्त ठरत आहे. जबरदस्त मायलेज, कमी खर्च, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि EV सारखा स्मूथ ड्राईव्ह या सर्व गोष्टींमुळे हाइब्रिड कार भविष्यात भारतीय बाजारपेठेत आणखी वेगाने पसरतील अशी चिन्हे आहेत.