जगाचा पेट्रोल-डिझेलचा प्रश्न कायमचा मिटणार, येणार मीठावर चालणार गाड्या; शास्त्रज्ञांनी लावला सॉल्ट बॅटरीचा शोध!


Salt Battery: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. जगासमोर भेडसावणारा हा प्रश्न आहे. पण आता तुम्हाला याच्या वाढत्या किंमतीचे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आता लिथियम बॅटरीला टक्कर देणारी एक नवीन बॅटरी येत आहे. जी फक्त स्वयंपाकघरातील मीठ वापरते. यामुळे इलेक्ट्रिक गाड्या, बाईक आणि मोबाईल फोन खूप स्वस्त आणि सुरक्षित होऊ शकतात. ही बॅटरी आगीचा किंवा स्फोटाचा धोका जवळपास शून्य ठेवते.   

Add Zee News as a Preferred Source

कोणी केलं संशोधन ?

जर्मनीतील प्रसिद्ध संशोधन संस्था फ्राउनहोफर आणि ऑस्ट्रेलियन कंपनी अल्टेक बॅटरीज यांनी एकत्र येऊन 8 वर्षे मेहनत घेऊन ही बॅटरी तयार केली. यासाठी त्यांनी सुमारे 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. आता ही बॅटरी प्रयोगशाळेतून बाहेर पडून बाजारात येण्याच्या मार्गावर आहे.

बॅटरीत काय खास?

या बॅटरीला “CERENERGY” म्हणतात. ही सोडियम म्हणजेच मिठातील मुख्य घटक आणि सिरॅमिकवर आधारित सॉलिड-स्टेट बॅटरी आहे. लिथियम, कोबाल्ट, निकेल किंवा ग्रॅफाइट यासारख्या महागड्या व दुर्मिळ धातूंची गरज नाही. फक्त खाण्याचे मीठ आणि सिरॅमिक पुरेसे!

बॅटरी कशी काम करते?

सामान्य लिथियम बॅटरीत द्रवरूप इलेक्ट्रोलाइट असते, पण ही बॅटरी पूर्णपणे घन (सॉलिड) स्वरूपाची आहे. त्यामुळे ती कधीही गळत नाही, आग लागत नाही आणि स्फोट होत नाही. एका सेलचे व्होल्टेज साधारण 2.6 व्होल्ट असते; अनेक सेल जोडून मोठी बॅटरी बनवली जाते.

किती सुरक्षित?

ही बॅटरी अत्यंत स्थिर असते. खूप वर्षे टिकते आणि कमी देखभाल लागते. मोठ्या विजेच्या ग्रिडमध्ये दिवस-रात्र ऊर्जा साठवण्यासाठी ती सर्वोत्तम मानली जाते. पर्यावरणालाही तिच्यापासून कोणताही धोका नाही.

भारतासाठी फायदा काय?

भारतात सरकार कोणत्याच एका बॅटरी तंत्रज्ञानाला प्राधान्य देत नाही, त्यामुळे मिठाची बॅटरी लवकरच येऊ शकते. गावखेड्यांतील लहान विज प्रकल्प, दूरदूरचे भाग आणि ऑफ-ग्रिड सिस्टीमसाठी ही बॅटरी वरदान ठरेल. किंमत कमी झाली तर पेट्रोल-डिझेलच्या गाड्या कमी होऊन स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या आणि बाईक सर्वसामान्यांच्या हाती येतील.थोडक्यात, स्वयंपाकघरातील मीठ आता फक्त जेवणाला चव देणार नाही, तर गाड्या-मोबाईल चार्ज करणार आहे! 

FAQ

१. प्रश्न : ही “मीठ बॅटरी” खरंच फक्त स्वयंपाकघरातील मीठ वापरते का?

उत्तर : होय! ही बॅटरी सामान्य टेबल सॉल्ट म्हणजे सोडियम क्लोराइड (NaCl) आणि सिरॅमिक सामग्री वापरून बनवली जाते. लिथियम, कोबाल्ट, निकेल किंवा ग्रॅफाइट यासारखी कोणतीही महागडी किंवा दुर्मिळ धातू वापरली जात नाही. त्यामुळेच ती इतकी स्वस्त आणि पर्यावरणस्नेही आहे.

२. प्रश्न : ही बॅटरी इलेक्ट्रिक गाडी किंवा मोबाईलमध्ये लावता येईल का?

उत्तर : सध्यासाठी ही CERENERGY बॅटरी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात विज साठवण्यासाठी (पॉवर ग्रिड, सौर प्रकल्प) बनवली आहे. पण तंत्रज्ञान पुढे गेल्यास भविष्यात इलेक्ट्रिक बाईक, छोट्या गाड्या आणि अगदी मोबाईल-लॅपटॉपमध्येही कमी खर्चात आणि जास्त सुरक्षिततेने वापरता येऊ शकते.

३. प्रश्न : लिथियम बॅटरीपेक्षा मीठ बॅटरीचे मुख्य फायदे कोणते?

उत्तर :  आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका जवळपास शून्य  खूप स्वस्त (मिठाची किंमत अगदी कमी)  पर्यावरणाला हानी नाही, रिसायकल करणे सोपे  खूप जास्त काळ (१५-२० वर्षे) टिकते  थंड-उष्ण हवामानातही उत्तम कामगिरी त्यामुळेच ती लिथियम बॅटरीला मोठी टक्कर देऊ शकते.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *