International Adivasi Day 2025 : आज जागितक आदिवासी दिवस आहे. जगातील आदिवासी लोकसंख्येच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट यादिवशी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्या सुधारण्यासाठी आदिवासींनी केलेल्या कामगिरी आणि योगदानासाठी कायम ओळखले जातात. 1982 मध्ये मानवी हक्कांच्या संवर्धन आणि संरक्षणावरील उप-आयोगाच्या आदिवासी लोकसंख्येवरील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या दिवशी, डिसेंबर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने प्रथम 9 ऑगस्ट हा दिवस जागितक आदिवासी दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
आवाज आदिवासी तरुणाईचा!
झी 24 तास ही वाहिनी नेहमी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आंबेडकर जंयती असो किंवा महाराष्ट्र दिन झी 24 तास नवीन पिढाला एक मंच उभा करुन देतात. त्यासोबत त्यांच्यामधील कलागुणांना वाव देऊन ती देशाच्या कानाकोपरापर्यंत पोहोचण्याच काम करते. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्तही झी 24 तास एक वैविध्यपूर्ण आणि खास शो घेऊन आला आहे, ज्याच नाव आहेस आवाज आदिवासी तरुणाईचा…गेल्या वर्षीही जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी भाषेतून बातमीपत्र सादर केलं होतं. यंदाच्या आदिवासी समुहातील दोन तरुण प्रसिद्ध रॅपरसोबत जबरदस्त शो घेऊन आला आहे. हा खास शो तुम्ही आज दुपारी 12.23 वाजता आणि संध्याकाळी 5.23 वाजता पाहू शकता.
माही जी (मधुरा घाणे)
माही जी एक रॅपर आहे. जंगलचा राजा तिचं फेमस रॅप आहे. आदिवासी समुदाय त्यांचे प्रश्न त्यांच जीवन रॅप मधून मांडण्याचा प्रयत्न करते. सामाजिक संदेश देत असते.
तर तिच्यासोबत सचिन ठेमका जो आदिवासी समाजातील एक तरुण गायक आहे. त्याची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. आदिवासी समाजातील तरुण, शिक्षण रोजगार या विषयावर लिखाण आणि गायन करतो.
तिसरा आहे प्रवीण खंडवी तोदेखील एक गायक आहे. त्याची अनेक गाणी हिट झाली आहेत. आदिवासी समाजातील तरुण पुढे यावेत यासाठी तो कायम प्रयत्न करत असतो. अनेक सामाजिक विषयावर लिखाण देखील त्याने केलं आहे. अनेक गाणे लिहिली आहेत आणि गायली आहेत.
तर त्यांच्यासोबत होता गौरव तुंबडा हा एक रॅपर आहे. आदिवासी समाजातील युवा पिढीला रॅप मधून संदेश देतो. तो रॅपच्या माध्यमातून व्यवस्थेला आदिवासी समाजातील प्रश्नांना वाचा फोडतो.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त झी 24 तासाच्या ‘ आवाज आदिवासी तरुणाईचा’ या विशेष कार्यक्रमात ह्या तरुणांकडून आदिवासी समाजातील समस्या जाणून घेतल्या. तसंच आदिवासी समाजाचे प्रश्न, शिक्षणची सद्यस्थिती, बेरोजगारी यासह अनेक विषयावर तरुणांनी मतं मांडली. त्यासोबत त्याच्या गाण्याची सुरेल मैफिल रंगली आहे. प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहिल असा हा कार्यक्रम आहे.