Mumbai Megablock Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कधी व कुठे आहे हे जाणून घेऊयात. पाहुयात संपूर्ण वेळापत्रक.
मध्य रेल्वेवरील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर येथे पायाभूत कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.
ब्लॉक कधी आणि कुठे?
– शनिवारी रात्री 12.10 ते रविवारी सकाळी 6.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ठाकुर्ली आणि कल्याण फलाट क्रमांक 1, 1अ, 2 आणि 3 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, डोंबिवली-कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल.
– शनिवारी रात्री 1.15 ते पहाटे 4.15 वाजेपर्यंत अंबरनाथ-बदलापूर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. शनिवारी रात्री उशिरापर्यंत 21 लोकल सेवा रद्द राहतील. रविवारी सकाळपर्यंत 27 लोकल रद्द केल्या जातील.
1) मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक कधी आहे?
मेगाब्लॉक शनिवारी (9 ऑगस्ट 2025) रात्री 12:10 वाजेपासून रविवारी (10 ऑगस्ट 2025) सकाळी 6:55 वाजेपर्यंत असेल. तसेच, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रात्री 1:15 ते पहाटे 4:15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
२) ब्लॉक कोणत्या मार्गांवर आहे?
ठाकुर्ली आणि कल्याण फलाट क्रमांक 1, 1अ, 2 आणि 3 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर.
डोंबिवली-कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर.
अंबरनाथ-बदलापूर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर.
3) कोणत्या लोकल सेवा बंद राहतील?
अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या सर्व लोकल सेवा ब्लॉक कालावधीत बंद राहतील. शनिवारी रात्री उशिरापर्यंत 21 लोकल आणि रविवारी सकाळपर्यंत 27 लोकल रद्द राहतील.