मोह, मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी गीता ऐका: स्वामी प्रत्ययानंद सरस्वती – Ahmednagar News



सावेडीत श्रीमद् भगवत गीता ज्ञान यज्ञ सुरू झाले स्वामी प्रत्ययानंद सरस्वती प्रवचन करताना

.

जन्माचे मूळ शोधले की आपल्याला माया ही माता आहे, हे समजते. कारणे सापडले की उपाय सापडतो. त्याप्रमाणे बंधनाची कारणे शोधले की त्या बंधनातून आपण सुटू शकतो मोह, माया या मध्ये आपण बांधलो आहोत. या बंधनातून मुक्त होण्यासाठी गीता ही ऐकायची असते, असे निरुपण नांदेड येथील स्वामी प्रत्ययानंद सरस्वती यांनी केले. चिन्मय मिशन अहिल्यानगर द्वारा आयोजित श्रीमद् भगवत गीता ज्ञानयज्ञ अध्याय १४ वा चे विवेचन स्वामी प्रत्ययानंद सरस्वती यांनी पाइपलाइन रोडवरील श्रीकृष्ण नगर मध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सांगण्यास प्रारंभ केला.याप्रसंगी नगर चिन्मय मिशन शाखेचे अध्यक्ष अॅड. धोंडीराम घोरपडे, खजिनदार देवराम मोरे, कोषाध्यक्ष उत्तम साळुंखे, शिवाजी ढोले, रामचंद्र शिर्के, खंडेराव मगर, विद्याताई हारदे उपस्थित होते. स्वामी प्रत्ययानंद सरस्वती यांनी सकाळी सत्वगुण, दिवसभर रजोगुण व रात्री तमोगुण स्वीकार करा जास्तीत जास्त सत्वगुणांमध्ये राहा, असे सांगितले. सात दिवस सुरू असलेल्या या अध्याय प्रवचनात त्यांनी बंधने माणसावर कसे बांधतात. हे कळले तर त्या बंधनातून आपण सुटू शकतो. मोह, मायाने आपण बांधलो आहोत. पक्षी ज्याप्रमाणे राहतात त्याप्रमाणे आपली अवस्था असते. पोपट हा पिंजरा शोधतो. त्याप्रमाणे जे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत. ते तुरुंगात असल्यासारखे असतात. काही लोक कबुतरा सारखे असतात. कबुतराला आपण निसर्गात मुक्त करतो पण ते कबूतर परत घरी येतात तर काही लोक गरुडासारखे झेप घेतात ते परत येत नाहीत, असे ते साधुसंत असतात ते कधीच बंधनात अडकत नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24