अमरावती जिल्हा परिषदेशी संबंधित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील (डीआरडीए) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार डीआरडीएच्या प्र
.
आमदार रोहित पवार रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने अमरावतीत आले होते. त्यावेळी संपकर्त्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. त्यानंतर आमदार पवार यांनी जिल्हा परिषदेच्या सीइओ संजीता महापात्र यांचा कक्ष गाठून त्यांच्याशी चर्चा केली.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक गेल्या १२ वर्षांपासून अमरावतीत कार्यरत असून त्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात. अशाच दबावामुळे एका कर्मचारी महिलेने तीन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
संपकर्त्या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की प्रकल्प संचालक देशमुख यांची जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांशी वागणूक योग्य नाही. त्यांच्या मतानुसार न ऐकल्यास त्या प्रत्येकाचा ‘केआरए’ खराब करून संबंधिताला नोकरीतून बाद करण्याचा प्रयत्न करतात.
आमदार रोहित पवार यांनी सीइओंना सांगितले की देशमुख पदावर कायम राहिल्यास आणखी काही कर्मचाऱ्यांचा बळी जाऊ शकतो. या प्रकरणी सीइओ संजीता महापात्र यांनी नि:पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की प्रत्येक कर्मचाऱ्याची बाजू समजून घेतली जाईल आणि कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.
आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी ग्रामविकास सचिवांशीही बोलणी केली असून बोलणी झाल्यानुसार कृती न झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले आहे.