सासरच्या छळाला कंटाळून महिलेने केली आत्महत्या: पती, सासू आणि चुलत सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; फुरसुंगीतील घटना – Pune News



फुरसुंगी, हडपसर येथे सासरच्या सततच्या छळाला कंटाळून २४ वर्षीय सीमा अक्षय राखपसरे या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती अक्षय सुरेश राखपसरे, सासू आशाबाई सुरेश राखपसरे आणि चुलत सासरे यांच्यासह अन्य नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आ

.

रवी खलसे (५०) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सीमा आणि अक्षय यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर सीमाकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली होती. तिला सातत्याने टोमणे मारून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून सीमाने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली.पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

याचबरोबर लोणी काळभोर भागात कामावरून काढून टाकण्याच्या धमकीमुळे तुकाराम ज्ञानेश्वर भाले (३८) या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सुनील विजय कसबे (३२), करण सोमनाथ कसबे (२२) आणि अक्षय रामजीत केवट (३०) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

भाले यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी त्यांना सतत शिवीगाळ करत असत आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असत. या त्रासाला कंटाळून भाले यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

खांबावर आलेली झाडाची वेल काढण्याचे काम करणाऱ्या मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक भागात घडली.महेबुब कासीम पठाण (वय ४१, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे, एनडीए रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेबुब यांचा भाऊ गुड्डू पठाण (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24