उद्धव ठाकरे यांच्या बैठक व्यवस्थेवरून सुप्रिया सुळे यांनी अजब दावा केला आहे. शेवटची रांगच सर्वात महत्त्वाचे असते. आपण सिनेमा पहायला जातो, त्यावेळी देखील मागच्या रांगेतले तिकीट काढतो. त्यामुळे आता उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसल्या वरुन जे टीका करत आहे
.
या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, राहुल गांधी प्रेझेंटेशन देत होते आणि सर्वात मागे बसूनच प्रेझेंटेशन चांगले दिसत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे मागे बसलेले होते. वास्तविक मागच्या रांगेत बसूनच सिनेमा चांगला दिसतो. आपण चित्रपट पाहायला जातो, त्या वेळी मागच्या रांगेतले तिकीट काढतो. मागच्या रांगेतील तिकीटच सर्वात महागडे तिकीट असते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मागच्या रांगेत बसले होते, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…