शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या घरी धार्मिक विधी करणारे शंकराचार्य यांचा ‘स्टेट गेस्ट’चा दर्जा गृहमंत्रालयाने काढून घेतल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी
.
संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, निवडणूक आयोग हा भाजपचा हस्तक आणि मोदी-शहा यांचा गुलाम झाला आहे. राहुल गांधी यांनी ईव्हीएममधील अनियमिततेबाबत जे पुरावे दिले, ते सर्व निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरच उपलब्ध आहेत. मतदान चोरी करणारे लोक कसे निवडून येतात, हे यातून दिसून येते. ‘चोराला-चोर साथीदार’ असल्याचे म्हणत, राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘उद्धव ठाकरेंच्या आसनावरील टीका भंपक’
राहुल गांधी यांच्या सादरीकरणावेळी उद्धव ठाकरे यांच्या आसन व्यवस्थेवरून झालेल्या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. स्क्रीनसमोर बसून पाहणे त्रासदायक असल्याने आम्ही मागे बसलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांना तांत्रिक गोष्टींची जाण असल्याने त्यांनी मागे बसून सादरीकरण पाहणे पसंत केले. भाजपच्या आयटी सेलवर टीका करताना ते म्हणाले, ही लोकं भंपक आहेत आणि त्यांना हे समजले पाहिजे.
खासदार म्हस्के यांनी उत्तर द्यावे
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर शरद पवार यांच्या प्रकृतीची खरी विचारपूस केली असती, तर त्यांचा पक्ष काढून अजित पवार यांना दिला नसता. राऊत यांनी मस्केंना प्रश्न विचारला की, शंकराचार्यांचा ‘स्टेट गेस्ट’चा दर्जा का काढण्यात आला, याचे उत्तर मस्केंनी द्यायला हवे.